शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुकेश अंबानीच्या लेकाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु, कपडे, लोकेशन, डेकोरेशनसाठी इतका खर्च करणार अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 15, 2024 | 3:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Anant and radhika pre-wedding ceremony

मुकेश अंबानीच्या लेकाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु, कपडे, लोकेशन, डेकोरेशनसाठी इतका खर्च करणार अन्...

सध्या मनोरंजन विश्वामध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. सेलिब्रिटी मंडळींचा विवाहसोहळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अशामध्येच आता आणखी एका लग्नाची चर्चा सुरु आहे. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटसह लग्नबंधनात अडकणार आहे. गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स ग्रीन्स येथे १ ते ३ मार्चमध्ये विवाहपूर्वीचे विधी पार पडणार आहेत. २०२३मध्ये अनंत व राधिकाचा शाही साखरपुडा पार पडला. यादरम्यान आता लग्नापूर्वीच्या तयारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या विवाहसोहळ्यासाठी भारतातील अनेक दिग्गजांची हजेरी लागणार असून भारतातील हा शाही विवाहसोहळा असणार आहे. (Anant and radhika pre-wedding ceremony)

नुकतेच अंबानी यांच्या फॅनपेजवरुन अनंत व राधिकाच्या लग्नापूर्वीच्या तयारीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये जामनगर येथील निवासस्थानावर केलेली फटाक्यांची अतिषबाजी दिसत आहे. तसेच इतर शेअर केल्या गेलेल्या फोटोमध्ये राधिका, तिचे वडील वीरेन मर्चंट व तिची मैत्रिण दिसत आहे. सदर फोटोंमध्ये सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद असून वीरेन यांनी काळया रंगाचा गळाबंद कोट परिधान केला होता.

आणखी वाचा – हटके इंटिरिअर, स्वादिष्ट जेवण अन्…; शाहरुख खानच्या बायकोने मुंबईत सुरु केलं स्वत:चं आलिशान हॉटेल, सगळं काही आहे खास

मार्चमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना खास भेट देण्यात येणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी महाबळेश्वरमधील दिव्यांग कारागीर खास भेट तयार करत आहेत. ‘स्वदेश’ हे भारतातील पारंपारिक कला आणि कारागिरांसाठी काम करत असून दृष्टीहीन कारागिरांकडून मेणबत्त्या तयार केल्या जात आहेत. ही संस्था आपल्या देशातील प्राचीन कला आणि हस्तकलेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी फक्त प्रयत्नच नाही तर नेतृत्वही करत आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेश वस्त्रकलेमध्ये योगदान देणाऱ्या प्रतिभावान कलाकारांना ही संस्था प्रोत्साहन देते.

आणखी वाचा – मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने गर्लफ्रेंडसह उरकला साखरपुडा, ‘नागिन’ फेम अभिनेत्रीबरोबर लवकरच विवाहबंधनात अडकणार, फोटो समोर

अनंत आणि राधिकाचा १९ जानेवारी २०२३ ला गोल धना समारंभामध्ये साखरपुडा संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी लग्नपत्रिकेची झलकही पाहायला मिळाली होती. या पत्रिकेसह मुकेश आणि निता अंबानी यांनी स्वतः लिहिलेला मजकूरदेखील व्हायरल झाला. अनंत व राधिकाची जामनगरमध्ये लग्नगाठ बांधली जाणार असून लग्नाचे सर्व विधी हे १०,११ व १२ जुलै रोजी पार पडणार असून एप्रिल २०२४ मध्ये लग्नसमारंभ पार पडणार आहे. अजूनही अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तारीख अंबानी कुटुंबाकडून निश्चित केलेली नाही.

Tags: ambani family weddinganant ambaniAnant and radhika pre-wedding ceremonyanant and radhika weddingradhika marchant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Ravi Jadhav Home

Video : अंगण, तुळस, नदी अन्…; कोकणातल्या गावी पोहोचले रवी जाधव, संगमेश्वरमध्ये इतकं सुंदर आहे घर, म्हणाले, "गावी गेलं की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.