Amy Jackson Became Mother : अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. दोघेही आई-बाबा झाले असून त्यांनी चिमुकल्या लेकीचं स्वागत केलं आहे. अथिया आणि केएल राहुल यांनी दिलेल्या आनंदाच्या बातमीने सुनील शेट्टी यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही गोड बातमीने बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण असून दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने आई झाली असल्याची गुडन्यूज दिली आहे. ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल एमी जॅक्सन दुसऱ्यांदा आई झाली आहे. हिंदी व्यतिरिक्त साऊथ चित्रपटांमध्ये काम केलेल्या एमीने तिच्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर दाखवली आहे.
लेकाच्या झलकसह त्याचे नावही समोर आले आहे. एमीलाही तिच्या पहिल्या जोडीदारापासून एक मुलगा असल्याची माहिती आहे. एमी जॅक्सनने तिचा पार्टनर एड वेस्टविकबरोबर ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत. त्यात त्यांचा लहान मुलगाही त्यांच्या मांडीवर आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जगात स्वागत आहे बाळा”. आपल्या मुलाचे नाव सांगताना त्यांनी लिहिले, “ऑस्कर अलेक्झांडर वेस्टविक”.
एमीच्या पोस्टवर अभिनंदन करणाऱ्यांचा ओघ सुरु झाला आहे. अदा खानपासून बंदगी कालरापर्यंत अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर चाहतेही भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अक्षय कुमारबरोबर ‘सिंग इज ब्लिंग’, रजनीकांतबरोबर ‘2.0’, प्रतीक बब्बरसह ‘एक दीवाना था’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या एमीबद्दल बातम्या आल्या होत्या की तिने प्रतीकला डेट केले होते. एमी २०११ ते २०१५ पर्यंत मुंबईत होती, पण त्यानंतर ती लंडनला गेली.
एमीने होटेलियर George Panayiotou ला डेट केले. जानेवारी २०१९ मध्ये झांबियामध्ये त्यांचा साखरपुडा झाला. लग्नाआधीच ॲमीने सप्टेंबर २०१९ मध्ये एका मुलाला जन्म दिला. २०२१ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. २०२२ मध्ये एमीने इंग्लिश अभिनेता एड वेस्टविकला डेट करायला सुरुवात केली. २०२४ मध्ये त्यांनी लग्न केले आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये, एमीने तिच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केली आणि लग्नाच्या सात महिन्यांनंतर ती आई झाली.