कलाकार मंडळी ही त्यांच्या कामातून वेळात वेळ काढून स्वतःसाठी स्वतःच्या घरासाठी, कुटुंबासाठी वेळ देताना दिसतात. यांत अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या कुटुंबासोबत बरेचदा वेळ घालवताना दिसते. मराठी बरोबरच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली ती म्हणजे ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील तिच्या ‘चंद्रा’ या भूमिकेमुळे. सोशल मीडियावरही अमृता नेहमीच चर्चेत असते. विविध फोटो, नृत्याचे रील्स शेअर करत ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अशातच अमृताच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. (Amruta Khanvilkar shares funny video)

अमृताचं तिच्या कुटुंबावर विशेष प्रेम असलेलं पाहायला मिळतं. ती तिच्या आईसोबतचे अनेक फोटो कायमच शेअर करत असते शिवाय ती तिच्या बहिणीच्या मुलांचेही फोटो आणि रील्स शेअर करताना दिसते. अशातच अमृताने नुकताच तिच्या बहिणीच्या मुलीसोबतचा म्हणजे तिच्या भाचीसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिची भाची नुरवीची हेअरस्टाईल करताना दिसतेय. मात्र अमृताची हेअरस्टाईल करताना फजिती झालेली पाहायला मिळतेय.
पाहा अमृताची कशी झाली फजिती (Amruta Khanvilkar shares funny video)
अमृताने शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. दरम्यान या कमेंटमधील अभिनेत्री मंजिरी ओक हिची कमेंट अधिक लक्षवेधी आहे, मंजिरीने अमृताच्या या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं आहे की, “इट्स ओके अमृता, येईल तुला मला खात्री आहे असं म्हणत मजेशीर कमेंट केली आहे.”
“कालपर्यंत कॉम्प्लिकेटेड वाटणाऱ्या गोष्टी देखील मी केल्या आहेत आणि आज अचानक व्हिडीओ करायला घेतला आणि मला जमत नाही असं का होतंय कळत नाही आहे”, असं देखील नुरवीची हेअरस्टाईल करत असताना अमृताने म्हटलं आहे.