‘रावण’ चित्रपट प्रदर्शित होऊन १४ वर्षे झाली असून अमिताभ बच्चन यांनी यानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिषेक बच्चनचे कौतुक केले असून चित्रपटाबद्दल लिहीत खास असं कॅप्शनही दिलं आहे. यावेळी मात्र ते ऐश्वर्या राय बच्चनबद्दल काहीही बोलले नाहीत. याआधी असे बरेचदा घडले आहे. अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याच्या चित्रपटाचे कौतुक केले होते परंतु आपल्या सूनेचे नाव घेतले नव्हते. अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लेकाचे खूप कौतुक केले आले. (Amitabh Bachchan ignored Aishwarya Rai)
पण या चित्रपटात ऐश्वर्या मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली असतानाही सून ऐश्वर्याचे कौतुक का झाले नाही हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. अभिषेकच्या फॅनपेजवरुन ‘रावण’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. या पोस्टसह कॅप्शन देत त्यांनी असं लिहिलं आहे की, “या चित्रपटाला १४ वर्षे पूर्ण झाली असून अभिषेक-ऐश्वर्याचा चित्रपटातील अभिनय अविस्मरणीय आहे. अमिताभ बच्चन यांनी अभिषेकच्या फॅनपेजवरील ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. आणि त्यासह कॅप्शन देत त्यांनी लिहिले आहे की, “अभिषेकचा अविस्मरणीय अभिनय. तुझ्या सर्व चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता आणि हेच खऱ्या कलाकाराचे मूल्य आहे. प्रेम”.
Abhishek an unforgettable performance .. so different from all the others in other films of yours .. and that is the true value of an artist !! love ❤️ https://t.co/0tebluqr0D
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 18, 2024
अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याचे खूप कौतुक केले. पण सूनेचे अजिबात कौतुक केले नाही, यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या सूनेची उघडपणे स्तुती न करण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत. मात्र, त्यात कितपत तथ्य आहे, याबाबत काही सांगता येणार नाही.
मणिरत्नम दिग्दर्शित ‘रावण’ हा चित्रपट १८ जून २०१० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात अयशस्वी ठरला.