अमिताभ बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता नंदा हिला ५० कोटी रुपयांचा आलिशान बंगला भेट दिला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांनी श्वेताला जुहू येथील ८९०.४७ चौरस मीटर व ६७४ चौरस मीटर आकाराचे दोन भूखंड भेट म्हणून दिले आहेत. जुहूमधील अमिताभ बच्चन यांचा ‘प्रतिक्षा’ हा बंगला आता श्वेता बच्चनच्या नावावर झाला आहे. श्वेता बच्चन नंदा एक उत्तम लेखिका आहे व उद्योजक आहे. तिने ‘पॅराडाईज टॉवर्स’ ही बेस्ट सेलिंग कादंबरी लिहिली आहे. तिला नव्या नवेली नंदा व अगस्त्य नंदा ही दोन अपत्ये आहेत. (Amitabh Bachchan gifted Bunglow)
अहवालानुसार, मालमत्तेसाठी भेटवस्तू म्हणून दिलेली ही वास्तू ८ नोव्हेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आली. अमिताभ बच्चन यांनी व्यवहारासाठी ५०.६५ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले होते. दोन्ही भूखंड विठ्ठल नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.चा भाग असल्याचे दस्तऐवजात दिसून आले. अहवालानुसार, दस्तऐवजात अमिताभ बच्चन व जया बच्चन हे देणगीदार म्हणून आहेत. शिवाय श्वेता नंदा देणगीदार म्हणून दाखवण्यात आली आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या बंगल्याचे नाव ‘प्रतिक्षा’ ठेवले आहे. त्यांच्या वडिलांच्या कवितेत ‘स्वागत सबके लिए यहाँ पर नहीं किसीके लिए प्रतिक्षा’ असा उल्लेख आहे (येथे सर्वांचे स्वागत आहे, कोणाला येथे वाट पाहावी लागणार नाही).
आणखी वाचा – अबब! प्राजक्ता माळीने घातला तब्बल ‘इतक्या’ किलोंचा घागरा, म्हणाली, “नीट चालता…”
‘प्रतिक्षा’ हा अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील पहिला बंगला होता आणि ते आपल्या आई-वडिलांसोबत म्हणजेच आई तेजी व वडील कवी हरिवंशराय बच्चन यांच्यासह तेथे राहत होते. याशिवाय त्यांचे जुहूमध्ये दोन बंगले आहेत. ‘जलसा’ व ‘जनक’ अशी त्यांची नाव आहेत. सध्या ते कुटुंबासह ‘जलसा’ बंगल्यात राहतात.