शुक्रवार, मार्च 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Like आणि Subscribe चा थ्रीलर टीझर प्रदर्शित, अमेय वाघ व अमृता खानविलकरच्या भूमिकेची चर्चा, मर्डर मिस्ट्री उलगडणार

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 24, 2024 | 1:09 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amey Wagh Jui Bhagwat and Amruta Khanvilkar starrer Like Aani Subscribe Marathi Movie Teaser

Like Aani Subscribe चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता टीझर समोर आला आहे. हा टीझर अंगावर शहारा आणणारा आहे.

Like Aani Subscribe Movie : मराठी सिनेसृष्टीत सध्या नानाविध विषयांवरील आधारीत चित्रपटांची निर्मिती होत आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हे वाक्य सर्वश्रृत झालं आहे. अनेकदा आपण गाण्यांमधून किंवा कोणाच्या बोलण्यातूनही हे असे अनेक शब्द ऐकले आहेत. तसंच रोजच्या मोबाइलच्या वापरातही हे शब्द येतात. अशातच काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर एका चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे पोस्टर झळकले होते. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई भागवत आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटाच्या माध्यमातून जुई मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. (Like Aani Subscribe Movie Teaser)

पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. हा टीझर अंगावर शहारा आणणारा आहे. या टिझरमध्ये जुई भागवत एका व्लॅागरच्या भूमिकेत दिसत असून ती एका मोठ्या संकटात अडकल्याचेही पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अमृता खानविलकरही पोलिसांच्या मदतीने कशाचा तरी शोध घेत आहे. त्यामुळे या सगळ्याचा परस्परांशी काही संबंध आहे का? तसंच यात मृतदेह आणि एका खुनाचाही उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे हे प्रकरण नक्की काय आहे? कोणी कोणाचा खून केला? अमृता खानविकार कसल्या आणि कोणत्या पुराव्यांच्या शोधात आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटामधून मिळणार आहेत.

आणखी वाचा – बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुंबईमध्ये मोठा अपघात, वांद्रेमधील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल, प्रकृती गंभीर

काही दिवसांपूर्वी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यात अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ यांचा सेल्फी होता. या पोस्टरमध्ये सेल्फीतील चेहरे आणि त्यांचे प्रत्यक्षातील चेहऱ्यावरील हावभाव खूप वेगळे होते. त्यामुळे यामागे काय रहस्य दडले आहे, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. त्यात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरनेही प्रेक्षकांच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना येत्या १८ ऑक्टोबर रोजी मिळणार आहेत.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’चा टीझर प्रदर्शित, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमची चित्रपटात वर्णी, कलाकारांच्या लूकने वेधलं लक्ष

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाचे निर्माते नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर आहेत. तसंच ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन व दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. या चित्रपटात अमेय वाघ, जुई भागवत, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags: Amey Waghamruta khanvilkarJui BhagwatLike Aani Subscribe Teaser
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

anurag dobhal brother instagram
Entertainment

अनुराग डोभालचे आरोप खोटे, भावाने पुराव्यांसह समोर आणलं सत्य, पत्नीला मारहाण आणि…

मार्च 6, 2026 | 12:45 pm
Simran Khedkar Mother
Entertainment

आठ वर्षांपासून सिंगल पॅरेंट, १२वी नापास आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने ४३व्या वर्षी घेतलं स्वतःच घर, म्हणाली..

मार्च 6, 2026 | 12:15 pm
Apurva Gore Wedding Rituals Begins
Entertainment

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीची लगीनघाई, ४० वर्ष जुनी आईची साडी नेसली आणि… ; ग्रहमखचे फोटो समोर

मार्च 6, 2026 | 11:19 am
Thalapathy Vijay dating Trisha Krishnan
Entertainment

थलापती विजयच्या अफेअरच्या चर्चा खऱ्या, गर्लफ्रेंडसह एकत्र स्पॉट झाला आणि…; पत्नीचे आरोप ठरले खरे

मार्च 6, 2026 | 10:35 am
Next Post
anita hanssnadani on hottifying incidence

"तो पँट काढून समोर उभा राहिला अन्…", सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला 'तो' भयावह अनुभव, म्हणाली, "घाणेरडा स्पर्श, नजर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.