अमेरिकन गायिका, गीतकार आणि अभिनेत्री मारिया कॅरीबद्दल एक दु:खद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पाच वेळा ग्रॅमी पुरस्कार पटकावणाऱ्या ५५ वर्षीय गायिकेच्या आई आणि बहिणीचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. रविवारी घडलेल्या घटनेत गायिकेच्या आई व बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी घडलेल्या या घटनेत दुर्दैवाने गायिकेने तिच्या आई व बहिणीला गमावलं आहे. त्यानंतर सोमवारी ‘तुमच्या शिवाय’ अशी पोस्ट शेअर करत तिने तिच्या दु:खी भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच या ‘कठीण काळात लोकांनी तिच्या गोपनीयतेचा आदर करावा’ असे आवाहन करणारी एक पोस्टही तिने शेअर केली आहे. (Mariah Carey Mother And Sister Passed Away)
‘पीपल्स मॅगझिन’ला दिलेल्या निवेदनात मारिया कॅरीने असं म्हटलं आहे की, “गेल्या आठवड्याच्या शेवटी मी माझी आई गमावली. याचे मला खूप दुःख झाले आहे. दुर्दैवाने माझ्या बहिणीलाही त्याच दिवशी आपला जीव गमवावा लागला. मी माझ्या आईच्या शेवटच्या क्षणी तिच्याबरोबर होते याबद्दल मला धन्यता वाटते. या अशक्य वाटणाऱ्या काळात मी सर्वांचे प्रेम आणि समर्थन तसेच माझ्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते”. मात्र, या पोस्टमध्ये गायिकेने आई व बहिणीच्या निधनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मारियाचे वैयक्तिक आयुष्य हे खूप संघर्षमय होते. अशातच तिने आता तिच्या डोक्यावरील आईचे छत्रही हरपले आहे
मारिया कॅरी फक्त ३ वर्षांची असताना तिचे आई-वडील विभक्त झाले होते. गायिकेचे वडील आल्फ्रेड रॉय कोरी यांचे २००२ मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. मारियाने याआधी तिच्या २०२० च्या ‘द मीनिंग ऑफ मारिया कॅरी’ या आत्मचरित्रात तिच्या आईबरोबरच्या विस्कटलेल्या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्यात मारियाने “माझ्या आयुष्यातील अनेक पैलूंप्रमाणेच माझा आईबरोबरचा प्रवास संघर्ष आणि तणावाने भरलेला आहे. आमचे नाते नेहमीच एका सावलीप्रमाणे राहिले”.
आणखी वाचा – Video : गिरगावच्या चाळीत दहीहंडीमध्ये मनसोक्त नाचायचे प्रदीप पटवर्धन, जुना व्हिडीओ व्हायरल, चाहतेही भावुक
तसंच मारिया कॅरीचे तिच्या भावंडांबरोबरचे संबंधही फारसे चांगले नव्हते. त्याचा भाऊ मॉर्गन केरी आणि त्याची दिवंगत बहीण ॲलिसन केरी यांच्याबरोबरच्या ताणलेल्या संबंधांबद्दलही तिने आपल्या आत्मचरित्रात विस्तृतपणे लिहिले मनःशांतीसाठी डॉक्टरांनी तिला या नातेसंबंध आणि कुटुंबाचा पुन्हा विचार करण्यास सांगितले होते. त्याच्या भावा-बहिणीकडूनही अपेक्षा होत्या, त्या कधीच पूर्ण झाल्या नाहीत.
आणखी वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळताच कलाकारांचा संताप, रितेश देशमुख म्हणाला, “राजे आम्हाला…”
दरम्यान, मारियाच्या वैयक्तिक आयुष्यात, मारिया स्वतः दोन मुलांची आई आहे. तिने दोनदा लग्न केले आणि दोन्ही वेळा घटस्फोट झाला आहे. याचबरोबर मारियाने तिच्या चाहत्यांसाठी एक संदेशही लिहिला आहे. त्याच्या कठीण काळात ज्यांनी त्याला साथ दिली त्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत. गायिका मारिया केरीची आई सुद्धा तितकीच उत्तम गायिका होती.