शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अतुल कुलकर्णींच्या गाजलेल्या ‘बंदिश बँडिट्स’ सीरिजचा नवीन सीझन चाहत्यांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 13, 2024 | 2:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amazon Prime's web series 'Bandish Bandits' second season of will be released in December 2024.

‘बंदिश बँडिट्स’ या वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी पाहता येणार, जाणून घ्या...

ॲमेझॉन प्राईमची लोकप्रिय वेबसीरिज ‘बंदिश बँडिट्स’ (Bandish Bandits) या सिरिजने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. नसिरुद्दिन शहा, ऋत्विक भौमिक, अतुल कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या सीरिजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. घराणं जपण्यासाठी बंदिशीपासून स्पर्धेत अडकणारा काका पुतण्यातला सांगितिक संघर्ष दाखवणारी वेबसीरिज अनेक पैलू उलगडून प्रेक्षकांना खिळवून ठेवते. ‘बंदिश बँडिट्स’ या सीरिजचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. सीरिजला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले होते. त्यानंतर या सीरिजचा दूसरा सीझन कधी येणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे. प्राईम व्हिडीओने ‘बंदिश बँडिट्स’च्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. (Bandish Bandits Season 2)

या वेबसीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ॲमेझॉन प्राईमकडून (Amazon Prime) या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवाय ही सीरिज कधी येणार याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘बंदिश बँडिट्स’ या वेबसीरिजचा दुसरा सीझन येत्या डिसेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘बंदिश बँडिट्स’ या सीरिजमध्ये राधे व तमन्ना यांच्या संगीतात उजवा ठरलेला राधे भारतीय पारंपरिक संगीताचं प्रतिनिधीत्व करताना दिसला, तर तमन्ना सोशल मीडिया स्टार पॉप वेस्टर्न अंदाजात दिसली होती.

View this post on Instagram

A post shared by Atul Kulkarni (@atulkulkarni_official)

आणखी वाचा – Satvya Mulichi Satavi Mulgi : पायाला लागल्याचे केदारचे खरं सत्य सर्वांसमोर येणार, नेत्रा करणार मोठा खुलासा, काय असेल नेमकं कारण?

‘बंदिश बँडिट्स’च्या कथेसह या सिरिजमधील गाण्यांनीही प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं.  वेबसीरिजच्या पहिल्या शॉटपासून सुरु होणारी धून असो की क्लासिकल वेस्टर्न फ्यूजन असो… या सीरिजचं प्रत्येक गाणं चाहत्यांच्या मनावर ठसलं आहे. या सीरिजमधील ‘सजन बिन’, ‘छेडखानिया’, ‘लब पर आये’, ‘विरह’ अशी सगळीच गाणी सोशल मीडियावर आजही जिवंत आहेत. अनेकजण या गाण्यांना आजही पसंती दर्शवतात.  

आणखी वाचा – मराठी दिग्दर्शक व निर्मात्याकडून सूरज चव्हाणला महागडं गिफ्ट, ‘त्या’ वस्तूचं नावही उच्चारता येईना, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

त्यामुळे आता आगामी सीझनमधून प्रेक्षकांना नवीन काय पाहायला मिळणार? राजस्थानच्या समृद्ध संस्कृतीला शोभणारा राजेशाही सांगितीक वारसा नक्की कोणाकडे जाणार? शास्त्रीय संगिताच्या कौटुंबिक कलहात काय नवे आव्हान येणार? हे ‘बंदिश बँडिट्स’च्या दुसऱ्या सीझनची सर्वांना उत्सुकता आहे. ‘बंदिश बँडिट्स’चा दुसरा सीझन केवळ प्राइम व्हिडिओवर भारतात आणि 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होईल.

Tags: Amazon Prime Bandish Bandits Web SeriesBandish Bandits Season 2Web Series News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Aitraaz Sequel Coming Soon

२० वर्षांनंतर 'ऐतराज' चित्रपटाचा सीक्वेल येणार, अक्षय कुमार-प्रियांका चोप्रा पुन्हा एकत्र दिसणार?, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.