सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती आणि हा अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या अवघ्या ३ दिवसांत कामाईचे अनेक विक्रम केले. मात्र पहिल्याच दिवशी या चित्रपटाच्या यशाला गालबोट लागले. या चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिलेचा मृत्यू झाला. याच महिलेच्या मृत्यूप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी ०८ डिसेंबर रोजी तीन जणांना अटक केली आहे. Siasat.com च्या वृत्तानुसार, संध्या थिएटरच्या मालक आणि व्यवस्थापकाव्यतिरिक्त एका सुरक्षा प्रमुखाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Pushpa 2 Premiere Stampede Woman Death)
वृत्तानुसार, संध्या थिएटरचे मालक एम संदीप, सुरक्षा प्रमुख गंधकम विजय चंद्रा आणि व्यवस्थापक एम नागराजू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (भारतीय न्याय संहिता) कलम १०५, ११८(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीटीआयला सांगितले होते की, अभिनेता किंवा थिएटर व्यवस्थापनाने याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. अल्लू येताच थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली, त्यात ३५ वर्षीय रेवती महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या दोन मुलांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.
मृत महिलेच्या कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे अल्लू अर्जुन, त्याच्या सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध कलम १०५, ११८(१) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मृत महिलेला त्याने आर्थिक मदत जाहीर केली आहे. याबद्दल तो म्हणाला की, “मी २५ लाख रुपये दिले आहेत. यामुळे त्यांचं ची नुकसान मी कधीच भरून काढू शकणार नाही. पण ही मी एक मदत त्यांना करत आहे. तिचे पती यातून बरे झाल्यावर मी त्यांची भेट घेईन आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करेन”.
आणखी वाचा – तुझ्या रंगी सांज रंगली! नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या लग्नाचे Unseen Photo व्हायरल, शुभेच्छांचा वर्षाव
दरम्यान, याबद्दल भावुक प्रतिक्रिया देताना अल्लू अर्जुन असंही म्हणाला की, “त्या घटनेचे आम्हाला दु:ख आहे. आम्हाला खरोखर काय झाले हे माहित नाही. मी गेल्या २० वर्षांपासून हे करत आहे. मी उद्घाटनाच्या दिवशी थिएटरमध्ये जातो. पण हे असं घडणे अत्यंत दुर्दैवी आहे. मी चित्रपट पाहिला आणि मला मध्यातच निघून जावे लागले कारण व्यवस्थापनाने मला समस्या असल्याचे सांगितले. आणि मग दुसऱ्या दिवशी रेवतीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे मला धक्काच बसला”.