Alia Bhatt Ranbir Kapoor Kitchen Inside Video : कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचा चाहतावर्ग नेहमीच आसुसलेला असतो. त्यांच्या आवडीचा कलाकार कसा राहतो, कसा जगतो याबाबत प्रत्येक चाहत्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडतं. इतकंच नाही तर कलाकार मंडळींचं घर नेमकं कसं आहे, त्यांच्याजवळ कोणत्या गाड्या आहेत याबाबतही चाहते त्यांच्या पोस्टद्वारे जाणून घेत असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच आता बॉलिवूडमधील एका लोकप्रिय कपलच्या घराचा सुंदर असा व्हिडीओ समोर आला आहे. हे कपल म्हणजे रणबीर कपूर व आलिया भट्ट. रणबीर व आलिया हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्या घराचा एक सुंदर असा व्हिडीओ समोर आला आहे.यामध्ये रणबीर-आलिया यांच्या स्वयंपाकघराची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर-आलियाची लेक राहा हिने हाताने बनवलेले चित्र, फ्रीजवर अडकवलेले चुंबकीय प्राणी आणि बरेच काही समाविष्ट आहे. जे चाहत्यांच्या नजरेत पडलं आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पाली हिलमधील एका अपार्टमेंटमध्ये राहतात आणि लवकरच ते त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. दरम्यान, त्यांच्या घरातील किचनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो त्यांच्या वैयक्तिक शेफने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आलिया व रणबीरचे मोठे स्वयंपाकघर अगदी साधे आहे.
आणखी वाचा – Paataal Lok या लोकप्रिय वेबसीरिजचा दूसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, कधी प्रदर्शित होणार?
रोजच्या वापरासाठीच्या वस्तूंनी ते परिपूर्ण भरले आहे. स्वयंपाकघरात मॉड्युलर किचनने शोभा वाढविली आहे. तसेच किचनमध्ये त्यांची मुलगी राहाबरोबरचा हाताने बनवलेला फोटोही आहे. फ्रीजवर ॲनिमेटेड प्राण्यांचे चुंबक पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मोठी खिडकी असल्यामुळे स्वयंपाकघरात भरपूर प्रकाश आहे. स्वयंपाकघरात सेंट्रलाइज्ड एसी आणि स्टोव्ह हुड देखील आहे. शेफने अनेक प्रकारचे पदार्थ बनवलेले आणि त्याची झलकही दाखवली आहे. रणबीर आणि आलियाच्या नवीन घराचे बांधकाम काही दिवसांपासून सुरु आहे. दोघेही अनेकदा त्यांच्या मुलीबरोबर तिथे जाऊन कामाचा आढावा घेतात.
१९८० मध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी पाली हिलवर एक बंगला विकत घेतला आणि त्याचे नाव कृष्णा राज ठेवले, जे ऋषी यांच्या आई-वडिलांच्या नावावर होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी बंगला पाडून उच्चभ्रू इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. रिपोर्ट्सनुसार, ही आठ मजली इमारत असेल आणि एक मजला नीतू कपूरचा असेल. रणबीर, आलिया आणि राहा दुसऱ्या मजल्यावर असतील. मात्र, याबाबत कुटुंबीयांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.