शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लेकीचं थाटामाटात बर्थडे सेलिब्रेशन, डेकोरेशनने वेधलं लक्ष, फोटो व व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 7, 2024 | 11:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Alia Bhatt And Ranbir Kapoor Daughter Raha 2nd Birthday

रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लेकीचं थाटामाटात बर्थडे सेलिब्रेशन, डेकोरेशनने वेधलं लक्ष

Alia Bhatt And Ranbir Kapoor Daughter Raha 2nd Birthday : रणबीर कपूर व आलिया भट्ट यांनी त्यांची मुलगी राहा हिच्या दुसऱ्या वाढदिवसाचे अनेक इनसाइड फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बर्थडे पार्टीची थीम आणि केकची झलक याच बरोबर पार्टीतील पाहुण्यांचा माहोलही दिसत आहे. मात्र, आलियाने हे फोटो शेअर केलेले नाहीत. तर आलियाची आई सोनी राजदानने तिच्या मैत्रिणींबरोबर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये नीतू कपूर, नीना गुप्ताही दिसत आहेत. याशिवाय राजदानने इन्स्टास्टोरीवर या पार्टीच्या काही झलकही दाखवल्या आहेत, ज्यामध्ये राहाचे आजोबा महेश भट्ट पोज देताना दिसत आहेत. यावेळी राहाच्या बर्थडेच्या केकचा फोटोही शेअर केला आहे.

राहाच्या वाढदिवसाच्या केकमध्ये गोंडस प्राणी आणि पानांच्या आकृत्या आहेत. या केकवर ‘हॅपी बर्थडे’ आणि ‘राहा २’ असे लिहिले आहे. मात्र, सोनी राझदानच्या इन्स्टा पोस्टमध्ये नीना गुप्ताची झलक पाहिल्यानंतर लोकांनी तिच्यावर टीका केली आहे. याशिवाय आलिया भट्टची बहीण पूजा भट्टनेही या पार्टीला हजेरी लावली होती. पूजाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बर्थडे पार्टीचे काही फोटोही शेअर केले आहेत. केक, वाढदिवसाची थीम आणि सजावट याशिवाय टॅटूची झलकही या फोटोंद्वारे दाखवण्यात आली आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींची प्रकृती खालावली, दामिनीची चाल ठरली यशस्वी, पारूवर आरोप करत सगळ्यांच्या नजरेतून पाडलं अन्…

View this post on Instagram

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

या पार्टीत काल रात्री करण जोहर त्याची मुले यश व रुहीबरोबर पोहोचला. करीना कपूर खानने तिचा धाकटा मुलगा जहांगीर अली खानबरोबर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. याशिवाय आलिया-रणबीरचा जवळचा मित्र अयान मुखर्जीही या पार्टीत सहभागी झाला होता. बेबोने राहाच्या वाढदिवसानिमित्त आलिया, राहा आणि रणबीरला तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक सुंदर फोटो शेअर करुन शुभेच्छाही दिल्या होत्या.

आणखी वाचा – ऐश्वर्या नारकरांचा दिलदारपणा, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेच्या सेटवर टीमला दिले सरप्राईज गिफ्ट्स, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

रणबीर कपूर व आलिया भट्ट ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आई-वडील झाले. सुमारे एक वर्षानंतर, गेल्या ख्रिसमसला, त्यांनी त्याच्या चाहत्यांना आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली. यानंतर राहा जेव्हाही घराबाहेर पडली तेव्हा तिला पापाराझीच्या कॅमेऱ्यांनी कैद केले. राहा कॅमेरा फ्रेंडली आहे आणि पापाराझींना पाहताना अनेकदा चेहऱ्याचे हावभाव बदलते.

Tags: alia bhatt and ranbir kapoorAlia Bhatt And Ranbir Kapoor Daughter Raha 2nd BirthdayRaha Kapoor Birthday
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Star Pravah Premachi Goshta serial fame apurva nemlkear shared post about the thane traffic jam.

ठाण्यातील वाहतूक कोंडीला वैतागली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, "मुली वाचवा, मुली शिकवा आणि मुलीला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.