‘बाजीगर’ चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्रींच्या भूमिकेने शिल्पा शेट्टीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बाजीगर चित्रपट हिट झालाच आणि या चित्रपटातील सह अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्डदेखील शिल्पाला मिळाला. त्यानंतर आग, मैं खिलाडी तू अनाडी, आओ प्यार करे, गॅम्बलर, हथकडी हे चित्रपट शिल्पाने गाजवले. तिच्यावर झालेली गाणी आणि त्यातील तिचा नृत्य हा नेहमीच अभिनयापेक्षा वरचढ ठरला. हळूहळू शिल्पा अभिनय सृष्टीत रमत गेली. बरेच चित्रपट तिने केले. त्या दरम्यान शिल्पा आणि अक्षय कुमारची ऑनस्क्रीन जोडी पाहणं रसिक प्रेक्षकांना विशेष आवडायचं. याबाबतचा एक किस्सा सेलिब्रिटींच्या भेटीगाठी या पुस्तकात अनिता पाध्ये यांनी सांगितला आहे.(Akshay Kumar Shilpa Shetty)
त्यांनी असं लिहिलंय की, पडद्यावर व पडद्याबाहेरही अक्षय कुमार-शिल्पाची जोडी जमली होती; परंतु हे विमप्रकरण सुरू होण्यापूर्वी ‘मोहरा’ चित्रपटात एकत्र काम करत असताना रवीना टंडन व अक्षयचे प्रेमसंबंध जमले होते आणि दोघांनी एंगेजमेंट केल्याच्या बातम्यादेखील प्रसिद्ध झाल्या होत्या. असं म्हणतात की, अक्षयच्या अनेक मैत्रिणी आहेत हे कळल्यावर नवीना व त्याचे संबंध दुरावले होते. त्यानंतरच अक्षयच्या जीवनामध्ये शिल्पाचा प्रवेश झाला होता.

पहा का तुटलं शिल्पा आणि अक्षयच नातं (Akshay Kumar Shilpa Shetty)
‘धडकन’च्या ऑडिओ रिलीजच्या फंक्शनमध्ये दोघेजण विवाह ठरल्यासारखे वावरत होते. लवकरच दोघे बोहल्यावर चढणार असल्याच्या बातम्यांना ऊत आला होता; अक्षयने द्विंकल खन्नाशी विवाह करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिल्पाबरोबरच्या त्याच्या प्रेमप्रकरणाला पूर्णविराम मिळाला होता. अक्षयच्या मामाने मला सांगितल्यानुसार शिल्पा व अक्षयने विवाह करायचा निर्णय घेतला असला तरी काही काळ करिअर करून विवाह करावा, असं शिल्पाला वाटत होतं;
हे देखील वाचा – अबब हे काय…! तन्वी गिरिजाचा सारखाच ड्रेस
परंतु कॅन्सरने आजारी असलेल्या अक्षयच्या वडिलांचा ओम भाटियांचा आजार बळावला, तेव्हा आपल्या निधनापूर्वी अक्षयचा विवाह व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्या वेळी म्हणे शिल्पाने विवाहापेक्षा आपल्या करिअरला अधिक महत्त्व दिलं. अक्षयने तिच्यासह लग्न न करण्याचा निर्णय घेतला. खरं खोटं अक्षय व शिल्पाच जाणोत मात्र त्यांचा विवाह होता होता राहिला हे मात्र खरं. (Akshay Kumar Shilpa Shetty)
अक्षय आणि शिल्पाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत होती. बॉलिवूडचा एक काळ या जोडीने चांगलाच गाजवला. अक्षय आणि शिल्पाची जोडी मोठ्या पडद्यावर विशेष रंजक होती. अक्षय आणि शिल्पाने मैं खिलाडी तू अनारी, हार्टबीट, इन्साफ, जानवर या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मोठा पडदा गाजवलेली ही जोडी ऑनस्क्रिनप्रमाणे ऑफस्क्रीनही खऱ्या आयुष्यात एकत्र पाहणं रंजक ठरली असती.
