असं म्हणतात एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य वयानुसार कमी होत जाते. परंतु काही जणांच्या वाढत्यावयानुसार त्यांचे सौंदर्य अजून बहरत जाते. जसे हिंदी सिनेविश्वातील जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचे सौंदर्य कायम आहे, तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. ऐश्वर्या त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. ऐश्वर्या सोशल मीडियावर सुद्धा बऱ्याच सक्रिय असतात. ऐश्वर्या त्यांच्या योगाचे व्हिडीओ तसेच फोटोज चाहत्यांसाठी नेहमी शेअर करत असतात. नुकताच ऐश्वर्या यांनी त्यांचा योगा करतानाचा एक फोटो त्यांचा सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Aishwarya Narkar motivational Video)

या व्हिडियोमध्ये ऐश्वर्या एका व्हिडियोमधील योगाआसन जसेच्या तसे कॉपी करताना दिसत आहेत. ऐश्वर्या यांनी या व्हिडिओला “Balance is not something you find…it is smthng you create ” असे प्रेरणा देणारे कॅप्शन दिले आहे. ऐश्वर्या यांच्या व्हिडिओवर त्यांच्या एका चाहतीने “I practice yoga. These videos inspire me to do better. Thank you ” असे म्हणत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच ऐश्वर्या यांची सहकलाकार तितिक्षा तावडे हिने देखील या व्हिडियोवर “My super woman” अशी कमेंट केली आहे.
हे देखील वाचा: स्पॉट माय साजनस रिफ्लेक्शन…असं म्हणत प्रियाने दिले चाहत्यांना चॅलेंज.
ऐश्वर्या नारकर यांचे पती देखील अभिनेते आहेत. या दोघांनी एकमेकांसोबत चित्रपट सृष्टीत काम देखील केलं आहे. ऐश्वर्या यांनी वयाची पन्नाशी ओलांडली असून, त्यांना लग्नाच्या वयाचा एक मुलगा देखील आहे. परंतु ऐश्वर्या यांना इतका मोठा मुलगा असेल असं कोणालाच वाटत नाही. ऐश्वर्या त्यांच्या नियमित टाकत असलेल्या पोस्टमुळे कधी कधी ट्रोल होताना सुद्धा पाहायला मिळतात. परंतु ऐश्वर्या या सगळ्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम अजिबात करून घेत नाहीत. (Aishwarya Narkar motivational Video)
हे देखील वाचा: ईशा-अनिशच्या नात्यात अनिरुद्ध आणणार दुरावा,कॅनडाला करणार ईशाची पाठवणी
ऐश्वर्या या तरुणमंडळींपेक्षा खूप जास्त ऍक्टिव्ह असताना दिसतात. ऐश्वर्या आपल्यला सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करताना दिसत आहेत. तसेच या मालिकेत ऐश्वर्या या नेगीटिव्ह भूमिका साकारताना दिसतायत. या मालिकेत त्या कटकारस्थान करताना सुद्धा दिसतात.