शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐश्वर्या नारकरांनी स्वतःच्या हाताने बनवले उकडीचे मोदक, गृहिणींना खास टिप्सही दिल्या, व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 29, 2025 | 10:46 am
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
 aishwarya narkar make ukadiche modak

ऐश्वर्या नारकरांनी स्वतःच्या हाताने बनवले उकडीचे मोदक, गृहिणींना खास टिप्सही दिल्या, व्हिडीओ समोर

aishwarya narkar make ukadiche modak : गणेशोत्सव हा सण सर्वत्र अगदी थाटामाटात साजरा केला जात आहे. अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. आणि सगळेच अगदी जल्लोषात बाप्पाचे स्वागत करतात. अशातच सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले असून ही कलाकार मंडळी बाप्पाची मनोभावे स्वागत करताना दिसत आहेत. सर्वत्र मंगलमय वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदकही सगळेच बनवतात. अनेकांना खूप सुंदर मोदक बनवता येतात तर काहींना मोदक बनवता येत नाहीत अशांसाठी आता मराठमोळ्या अभिनेत्रीने खास सल्ला दिला आहे. आणि मोदक बनवण्याची खास सोप्पी अशी रेसिपी शेअर केली आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्या नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांचं स्वतःच असं युट्युब चॅनेल आहे आणि त्या नेहमीच अनेक रेसिपीच्या व्हिडीओ या युट्युब चॅनेलवरुन शेअर करत असतात. ऐश्वर्या यांनी गणेशोत्सवाच्या दिवसांत उकडीचे मोदक बनवले होते. आणि याचा अगदी क्रमाक्रमाने असा व्हिडीओ त्यांनी शेअर केला.

आणखी वाचा – “पुन्हा येतील का असे दिवस?”, ‘आई कुठे…’ फेम अभिनेता रमलाय गणेशोत्सवातील बालपणीच्या आठवणीत, म्हणाला, “कोण श्रेष्ठ…”

२० ते २१ मोदकांसाठी लागणारे साहित्य आणि कृती त्यांनी शेअर केली आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनखाली त्यांनी असं म्हटलं आहे की, “उकडीचे मोदक रेसिपी! full vlog on YouTube soon…

साहित्य (२०–२१ मोदकांसाठी)

सारणासाठी :

किसलेला नारळ – २ कप

गूळ (किसलेला) – १ ½ कप

साजूक तूप – १ टेबलस्पून

वेलची पावडर – ½ टीस्पून

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

काजू/बदाम/किशमिश – थोडेसे (इच्छेनुसार)

उकडीसाठी :

तांदळाचे पीठ – २ कप @raanjaainaturals

पाणी – २ ½ कप

मीठ – चिमूटभर

साजूक तूप – १ टीस्पून

आणखी वाचा – अंकिता वालावलकरने पार पाडली सूनेची जबाबदारी, माहेरनंतर सासरच्या गणपतीच्या सेवेत रुजू, म्हणाली, “आयुष्यभर…”

कृती

१. सारण तयार करणे

  1. कढईत तूप गरम करून त्यात गूळ टाका.
  2. गूळ छान वितळल्यावर त्यात किसलेला नारळ घाला.
  3. गूळ व नारळ छान एकत्र मिसळून हलके परतून घ्या.
  4. मिश्रण थोडे घट्ट झाले की वेलची पावडर व सुकामेवा टाकून गॅस बंद करा.
  5. सारण पूर्णपणे थंड होऊ द्या.

२. उकड तयार करणे

  1. एका पातेल्यात पाणी, मीठ व तूप उकळा.
  2. उकळत्या पाण्यात तांदळाचे पीठ घालून झाकण ठेवा.
  3. दोन मिनिटांनी गॅस बंद करून पीठ नीट एकजीव होईपर्यंत ढवळा.
  4. गरम असतानाच हाताला थोडं तूप लावून उकड मऊसर मळून घ्या.

३. मोदक घडवणे

  1. उकडीचे लहान लहान गोळे करा.
  2. प्रत्येक गोळा हाताने किंवा मोदकाच्या साच्याने पातळ उघडा.
  3. मध्ये तयार केलेले सारण भरा व मोदकाच्या आकारात बंद करा.

४. वाफवणे

  1. इडली पात्रात किंवा मोदक पात्रात पानं (केळीची पाने असल्यास उत्तम) लावा.
  2. मोदक लावून साधारण १०–१२ मिनिटे वाफवा.

टिप्स

उकड गरम असतानाच मळल्यास मोदकाची कडा गुळगुळीत होतात.

ऐश्वर्या यांच्या मोदकाच्या कृतीचा व्हिडीओ पाहून अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Tags: aishwarya narkarmarathi actressukdich modak receipe
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Reshma Shinde Ganesh Festival

रेश्मा शिंदे व तिच्या नवऱ्याचा मराठमोळा अंदाज, परंपरा जपत एन्जॉय करत आहेत लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.