शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’च्या विजेतेपदानंतर मुन्नवर फारुकीचा नवा प्रोजेक्ट, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीसह करणार स्क्रीन शेअर, फोटो आले समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 13, 2024 | 1:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Munawar Faruqui New Project

'बिग बॉस'च्या विजेतेपदानंतर मुन्नवर फारुकीचा नवा प्रोजेक्ट, 'या' लोकप्रिय अभिनेत्रीसह करणार स्क्रीन शेअर, फोटो आले समोर

‘बिग बॉस १७’ हा रिऍलिटी शो विशेष गाजला. ‘बिग बॉस’मधील स्पर्धकांमुळे या शोची उंची वाढली होती. एकापेक्षा एक असलेल्या या स्पर्धकांनी उत्तम खेळी खेळलेली पायाला मिळाली. ‘बिग बॉस १७’ च्या पर्वात सुप्रसिद्ध कॉमेडियन मुन्नवर फारुकीने विजेतेपद पटकावलं. तर अभिषेक कुमार याने उपविजेतेपदावर नांव कोरलं. विजेतेपद पटकवल्यानंतर मुन्नवर फारुकी विशेष चर्चेत आला. अभिनेत्याचं त्याच्या राहत्या परिसरात म्हणजे डोंगरी येथे जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. (Munawar Faruqui New Project)

हा शो जिंकल्यानंतर ‘बिग बॉस १७’ चा विजेता मुन्नवर फारुकीकडे मोठे प्रोजेक्ट्स येत असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय मुन्नवर लवकरच आणखीही काही रिऍलिटी शोमध्ये सहभाग घेणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, मुन्नवर यांने स्वतःहून त्याच्या कोणत्याही आगामी प्रकल्पांचा खुलासा केलेला नाही. दरम्यान, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये तो टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीबरोबर दिसत आहे.

आणखी वाचा – “बी-ग्रेड चित्रपट, ड्रिंकमध्ये मादक पदार्थ अन्…”, रश्मी देसाईने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, “विषही…”

मुन्नवर फारुकी हे रिॲलिटी शोच्या जगातील एक प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियावर त्याची आधीपासूनच चांगली फॅन फॉलोइंग होती, ‘बिग बॉस १७’ नंतर ही संख्या झपाट्याने वाढलेली दिसली. मुन्नवरला ‘खतरों के खिलाडी १४’ या रिऍलिटी शोमध्ये पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातच, ‘कसौटी जिंदगी की २’ फेम हिना खानबरोबरचे त्याचे काही फोटो कोलकत्ता येथून समोर आले आहेत.

आणखी वाचा – आमिर खानचा लेक जुनैदची बॉलिवूडमध्ये एंट्री, साई पल्लवीसह रोमान्स करताना दिसला अन्…; सेटवरील फोटो आले समोर

हिना खान व मुन्नवर फारुकी एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी कोलकत्ता येथे गेले आहेत. शूटिंगदरम्यानचे दोघांचे काही फोटो समोर आले आहेत. यावेळी दोघांचा बंगाली लूक पाहायला मिळत आहे. यावेळी हिनाने पारंपरिक बंगाली साडी तर मुन्नवर पांढरी धोती-कुर्त्यात दिसला. दोघेही सेटवर एकमेकांसह मस्ती करताना दिसत आहेत. अभिनेत्री हिना खानने इन्स्टाग्राम स्टोरीवर कोलकत्ताचे काही फोटो शेअर केले आहेत. स्थानिक खाद्यपदार्थ व विविध संस्कृतींमधील खाद्यपदार्थांची छायाचित्रेही त्यांनी चाहत्यांसह शेअर केली आहेत.

Tags: bigg boss 17 winnerentertainmentmunawar farooqui with heena khanmunawar faruqui new project
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Tamil director vetri duraisamy death body found in Sutlej river himachal Pradesh

प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक वेट्री दुराईसामी यांचे निधन, ९ दिवसांनंतर सापडला मृतदेह, हिमाचलमध्ये झाला होता अपघात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.