Suraj Chavan And Jahnavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व संपलं असलं तरी यंदाच्या पर्वातील स्पर्धक चर्चेत असलेले पाहायला मिळत आहेत. यंदाच्या पर्वाच्या विजेतेपदावर रील स्टार सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. ‘बिग बॉस’ नंतर सूरज चव्हाणचं भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळत आहे. आता सूरज व जान्हवी यांची भेट झाली असल्याचं समोर आलं आहे. सूरजला भेटायला जान्हवी बारामतीत पोहोचली आहे. सूरजच्या गावी जात जान्हवीने खूप मोठं सरप्राइज त्याला दिलं आहे. जान्हवीला पाहून सूरजचा आनंद गगनात मावेनासा झालेला पाहायला मिळाला.
सूरजच्या घरी जान्हवीचं स्वागत झालं. जान्हवी यावेळी सूरजच्या घरातल्यांसह मिसळून गेली. सूरजचं भरभरुन कौतुकही जान्हवीने केलं. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरातील अनेक किस्सेही जान्हवी सांगताना दिसली. इतकंच नाही तर सूरजचे जान्हवीने डोळ्यावर आलेले केसही कापले याबाबतही तिने सांगितलं, मात्र हे दाखवलं नाही असंही ते दोघे म्हणाले. शिवाय टास्कमध्ये सूरज व जान्हवी आमनेसामने यायचे तेव्हा सूरज समोर स्त्री असल्याने थोडा बाचकायचा, मात्र यावेळी जान्हवीनेही त्याला वेळोवेळी बिनधास्त खेळ असं म्हणायची, याबाबतही जान्हवीने भाष्य केलं. आणि सूरजचं कौतुक केलं.
आणखी वाचा – शुभमंगल सावधान! लग्नबंधनात अडकला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप, पहिला फोटो समोर
जान्हवी सुरवातीला असं म्हणतेय की, “बारामतीत येऊन खूप भारी वाटतंय, तसंच सूरजला भेटून अतिशय आनंद झाला आहे. येथील रस्ते पण खूप छान आहेत. इतकंच नाही तर इथली सर्व माणसं खूप मस्त आहेत”. त्यानंतर जान्हवी सूरजच्या घरातल्यांना भेटते. सूरज जान्हवीला घेऊन त्याच्या आत्यांना व बहिणींना भेटायला घेऊन जातो. शिवाय सूरज जान्हवीला त्याची दुचाकीही दाखवायला घेऊन जातो. तेव्हा सूरजला भेट म्हणून आलेलं सर्व सामानही पाहायला मिळतं.
जान्हवी सूरजला विचारते, “गाडीच्या मागची सीट तू अजून बसवली नाहीस का?, अजून बसवायची राहिली आहे की, सापडली नाही तुला?”. यावर सूरज लाजत म्हणतो, “सापडली नाही. साधी सिम्पल मुलगी हवी. साडी नसणारी हवी. माझ्या बहिणीने साडी नेसली म्हणजे माझ्या बायकोने साडी नेसायला हवीच”. यावर जान्हवीही सूरजच्या उत्तरात होकार मिळवत म्हणते, “हो. ही बघ मी साडी नेसली आहे”.