सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हगवणेंना पाठीशी घालणारा वकीलच आरोपी, तीन वर्षांपूर्वीच मारहाणीचा गुन्हा दाखल, वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेताच…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2025 | 11:53 am
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Vaishnavi Hagawane death

हगवणेंना पाठीशी घालणारा वकीलच आरोपी, तीन वर्षांपूर्वीच मारहाणीचा गुन्हा दाखल, वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेताच…

Vaishnavi Hagawane death : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलं आहे. आत्महत्या केलेल्या वैष्णवीला न्याय द्यायचा सोडून तिच्याच अंगावर शिंतोडे उडवले जात आहेत. वैष्णवीच्या चारित्र्यावर शंकादेखील आरोपी हगवणे कुटुंबाकडून आणि त्यांच्या वकीलांकडून घेण्यात आली. हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू न्यायालयात वकील विपुल दुशींग यांच्याकडून मांडली जातं आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी असलेले संपूर्ण कुटुंब पोलीस अटकेत असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण आता न्यायालयाची पायरी चढलं असून न्यायालयात हगवणेंच्या वकिलाकडून युक्तिवाद करण्यात आला. यादरम्यान, त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला.

हगवणेंचे वकील विपुल दुशींग यांनी वैष्णवीलाचा या आत्महत्येला जबाबदार धरताच सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे. वकिलांनी केलेला युक्तिवाद कोणालाच पटला नसून त्यांच्यावर टीकेची झोड उमटवली जात आहे. अशातच समोर आलेल्या माहिनुसार विपुल दुशींग यांच्यावरच सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद आहे. ‘एबीपी माझा’ने या माहितीची पुष्टी केली आहे. सरकारी वकिलांवर हात उगारणारा वकील आरोपी हगवणेंच्या बाजूने लढा देत आहे हे एकमेकांना अगदी साजेसं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

आणखी वाचा – “अर्धवट माहिती देऊन…”, प्राची पिसाटच्या गंभीर आरोपांवर सुदेश म्हशीलकरांनी सोडलं मौन, म्हणाले, “यामुळे माझं कुटुंब…”

२०२२ साली पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात वकिल दुशींग हे एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरुन त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासह वाद झाला‌. त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशींग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली.अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशींग आणि त्यांच्याबरोबर असलेल्या अन्य दोन वकीलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावेळी अटक पुर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती.

आणखी वाचा – “माझ्या आयुष्यातला हिरो…”, अशोक सराफांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया समोर, निवेदिता सराफ म्हणाल्या, “तुझा प्रवास…”

वैश्नवीचे न्यायालयात चारित्र्य खराब करण्याचा प्रयत्न वकिलांकडून करण्यात आला. वैष्णवीची टेंडंसी ही सुसाईड करण्याची होती, तिचे एका व्यक्तीबरोबरचा संवादही समोर आला आहे. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा रॅट पॉइझन खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारुन तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, असा धक्कादायक दावा राजेंद्र हगवणेंचे वकील विपुल यांनी न्यायालयात केला.

Tags: dowry casepune crime newsVaishnavi Hagawane
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
covid cases in india

सावधान! महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, १२ जणांचा मृत्यू तर...; लस घेऊनही आजार का होतो?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.