मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री उर्मिला कोठारे व अभिनेता आदिनाथ कोठारे यांची जोडी सध्या फारशी कुठे एकत्र दिसत नाही. मात्र तरीही या जोडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. या दोघांना एक गोड मुलगीही आहे, जिचं नाव आहे जिजा. सोशल मीडियावर संपुर्ण कोठारे कुटुंबियांप्रमाणेच या घरातील सर्वात छोटी सदस्य जिजा कोठारेदेखील लोकप्रिय आहे. जिजाचा निरागसपणा नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. तिचे आईबाबा म्हणजेच उर्मिला आणि आदिनाथ अनेकदा जिजाबरोबरचे सुंदर फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात.
आदिनाथ गेले अनेक दिवस जिजा आणि त्याच्यामधील सुंदर नात्याबद्दल काही ना काही लिहित आहे. ‘जिजा आणि डॅडा’ अशा शीर्षकाखाली आदिनाथ त्याचे जिजाबरोबरचे अनेक संवादात्मक परिच्छेद सोशल मीडियावर शेअर करत असतो. हे संवाद प्रेक्षकांना वाचायलाही खूप आवडतात. आदीनाथ व जिजामधील हे संवाद रोजच्या जगण्यातल्या अगदी साध्या-साध्या गोष्टींवर भाष्य करणारे असतात. जिजाबरोबरचे असे अनेक किस्से व मनाला भिडलेल्या गोष्टी आदिनाथनं कागदावर उतरवल्या आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्या. अनेक चाहते या खास संवादाला लाइक्स व कमेंट्सच्या माध्यमातून पसंती दर्शवातात.
अशातच अनेक दिवसांनी आदिनाथने जिजाबरोबरचा खास संवाद पोस्ट केला आहे. यामध्ये जिजा आदिनाथला “डॅडा बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?” असा प्रश्न विचारते. यावर आदिनाथ गप्प बसतो. मग ती पुन्हा “डॅडा सांग ना” असं म्हणते. यावर आदिनाथ पुन्हा गप्पच बसतो. मग जिजा पुन्हा त्याला याबद्दल विचारते. तेव्हा आदिनाथ “अगं काही नाही दोन्ही सारखेच असतात” असं म्हणतो.
आणखी वाचा – Video : नवऱ्याच्या ‘त्या’ वागण्यामुळे आरती सिंहचा राग अनावर, रागाच्या भरात केलं असं कृत्य, व्हिडीओ व्हायरल
या पोस्टखाली आदिनाथने खास कॅप्शनही लिहिलं आहे. यामध्ये आदिनाथने असं म्हटलं आहे की, “बरीच लोकं मला विचारत असतात, “अरे तू ते #जीज़ाआणिडॅडा का लिहीत नाहीस हल्ली?” तर त्यचं उत्तर असं आहे की हल्ली माझ्या मुलीच्या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरच नसतात. असो. मला वाटतं तेही तुम्हाला आवडेल वाचायला. तर मग असा एक प्रयत्न करून बघू”. दरम्यान, आदिनाथच्या या पोस्टवर अनेक कलाकार व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्यांना ही पोस्ट आवडली असल्याचेही म्हटलं आहे.