रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खोटे अश्रू, जीभेला आवर घाल आणि…”, पॅडीची माफी मागणं जान्हवीचं नाटक म्हणत विशाखा सुभेदारची पोस्ट, म्हणाल्या, “नौटंकी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 22, 2024 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 vishakha subhedar angry post

अभिनेत्री विशाखा सुभेदार पॅडी कांबळेची माफी मागताच जान्हवी किल्लेकरवर भडकली

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात सध्या धुमाकूळ सुरु असलेला पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’मधील एक वाद सध्या चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळेचा अभिनय कारकिर्दीवरुन केलेला अपमान. जान्हवीने हा अपमान करताच अनेकांना खटकलं असून यावर अनेक कलाकार मंडळींनी आपलं मत मांडत सडेतोड भाष्य केलं आहे. अनेक कलाकार मंडळी, प्रेक्षक मंडळी जान्हवीच्या या वागण्यावर भाष्य करताना दिसत आहेत. अशातच पॅडी कांबळेची सिनेसृष्टीतील खास मैत्रीण विशाखा सुभेदार हिने ‘बिग बॉस’च्या घरात पॅडी गेल्यापासून त्याला पाठिंबा देताना दिसल्या.

आता आपल्या मित्राचा अपमान झाल्यानंतरही विशाखाने मित्राच्या बाजूने स्टॅन्ड घेत भाष्य केलं आहे. जान्हवीने अपमान केल्यानंतर तिने पॅडी कांबळेची माफी मागितली. मात्र ही माफी तिने मनोभावे न मागता खोटी असल्याचं म्हणत अनेकांनी दावा केला. यातच विशाखा यांनी जान्हवीने माफी मागल्यानंतर मित्राचं कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “हिच्या ओव्हर ऍक्टिंगला पुरस्कार द्या, रडणं खोटं…”, जान्हवीने पॅडीची माफी मागणं खोटं असल्याचा कलाकारांचा दावा, उडवली खिल्ली

विशाखा यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत, “तुला माफ केलं असं तो म्हणाला नाही. पण मनाचा मोठेपणा मात्र दाखवला. ठीक आहे. म्हणजे ठीक आहे असं म्हणाला. अभिनेता आहे तो, आम्ही रोज हे भाव भावनांचं विश्व घेऊन हिंडतो. पाठमोरा माणूस सुद्धा काय म्हणत असेल हे कळुच शकत आम्हाला, कारण तोच तर आमचा धंदा आहे. त्या अनुभवी माणसाला अश्रू खरे खोटे कळले नसतील?, तरीही तुझ्या खोट्या अश्रूंना तो ठीक आहे म्हणाला. कारण तो खरच बाप माणूस आहे. त्याने दिला असेल विषय सोडून पण बाई आता तरी जिभेला आवर घाल. तुला खूप शक्ती मिळो पॅडी”. असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझ्या पातळीला उतरणं माझ्या बाबाला…”, पॅडी कांबळेच्या लेकीने जान्हवीला सुनावलं, निक्कीची सावली आहे असंही म्हणाली अन्…

शिवाय त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करत, “काल काय झालं. बाहेरच्या जगात सुद्धा मी तुझं रक्षण करेन अशी रक्षाबंधन साजरी झाली. शॉपिंग झाली, माफी मागणं ही नौटंकी झाली, कॅप्टन बदलला आणि तेच जास्त माईकवरुन बोलले”, असं म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लढ बापू #आपला पॅडी #संयमकायम #अभिनेता हे हॅशटॅगही वापरले आहेत.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5vishakha subheadar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Maharashtra State Marathi Film Award to actor Shivaji Satam and actress Rohini Hattangadi see the full list

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोदावरी’ची बाजी, शिवाजी साटम, रोहिणी हट्टंगडी, अनुराधा पौडवाल यांचा गौरव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.