‘आमचं ठरलं’ हा हॅशटॅग सध्या कलाकार मंडळींमध्ये अधिक प्रमाणात वायरल होतोय. काही दिवसांपूर्वीच आमचं ठरलं असं म्हणत गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या अफेअरची ऑफिशिअल घोषणा केली. दोघांनी एकत्र एक फोटो स्टोरी पोस्ट करत ही आनंदाची गोड बातमी झाली. आता यानंतर सिनेसृष्टीतील आणखी दोन कलाकार मंडळींनी गुडन्यूज दिली आहे. (Swanandi Tikekar Relationship)
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी या दोघांनी आमचं ठरलं म्हणत एकत्र फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. स्वानंदी ने मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं, तर आशिषने अनेक रिऍलिटी शो मधून आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मन जिंकली. स्वानंदी छोट्या पडद्यावर जितकी सक्रिय असते तितकीच तिला गायनाची आवड देखील आहे, हे सर्वांनाच माहित आहे. तर आशिषने त्याच्या गायनातून सारेगमप, इंडियन आयडॉल हे रिऍलिटी शो गाजवले. आशिषचे जगभरात लाखो चाहते आहेत. आशिषने या व्यतिरिक्त घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील गुन गुन हे रोमँटिक गाणं आशिषने त्याच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे.
पाहा स्वानंदीचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे (Swanandi Tikekar Relationship)
काही दिवसांपूर्वीच स्वानंदीच्या अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या सुकन्या मोनेंसोबतच्या मालिकेची प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळाली. मात्र या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता स्वानंदी आणि आशिष रिलेशनशिप मध्ये असल्याची अधिकृत घोषणा स्वानंदी आणि आशिष यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एकत्र फोटो पोस्ट करत दिली. शिवाय आशिषने स्टोरी पोस्ट करत been busy falling love with this incredible woman असं म्हणत स्वानंदीला स्टोरी टॅग केली आहे.(Swanandi Tikekar Ashish Kulkarni)
हे देखील वाचा – निवेदिता यांना कळणार राज कावेरीचं सत्य, निवेदिता यांचं मोठं पाऊल
या त्यांच्या पोस्टवर सुकन्या मोने, नम्रता संभेराव, रसिका सुनील, अभिजित खांडकेकर, राहुल देशपांडे यांसारख्या अन्य कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आमचं ठरलं म्हणणारी आता ही क्युट जोडी केव्हा लग्नबानधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.
