शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅन्सरवर मात करुनही हा आजार पुन्हा होईल ही भीती कायम, सोनाली बेंद्रेचं धक्कादायक भाष्य, म्हणाली, “लपवून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 4, 2025 | 5:35 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
Sonali Bendre On Cancer

कॅन्सरवर मात करुनही हा आजार पुन्हा होईल ही भीती कायम, सोनाली बेंद्रेचं धक्कादायक भाष्य, म्हणाली, "लपवून…"

Sonali Bendre On Cancer : आजारपण कधी ओढावेल याची शाश्वती नाही. कधी काय होईल याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. आजकाल कॅन्सर सारखे आजाराचं सावट अधिक वाढले असल्याचे पाहायला मिळते. सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक कलाकार मंडळींनाही या आजाराचा सामना करावा लागतोय. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांना कॅन्सरसारख्या आजाराला सामोरे जावे लागले आणि यावर त्यांनी पूर्णतः मात करत ही लढाई जिंकलेली पाहायला मिळाली. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. सोनाली बेंद्रेनेही कॅन्सर सारख्या आजाराला सामोरे जात ही लढाई जिंकली.

नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत सोनालीने कर्करोगाबाबत भाष्य केलं आहे. स्त्रीरोगशास्त्रातील रोबोटिक सर्जरी या विषयावर चर्चा करण्यासाठी रोबोटिक स्त्रीरोग शस्त्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आले होते. यावेळी सोनाली म्हणाली, “जेव्हा मला कर्करोगाचं निदान झालं होतं, तेव्हा याबद्दल फार बोललं जात नव्हतं. लोक याबद्दल (C) या शब्दाचा उल्लेख करुन बोलायचे. मला पूर्वी हे जाणवलं नाही की कर्करोग इतका सामान्य झाला आहे. मी याबद्दल बोलल्यानंतर अनेकांनी माझ्याशी संपर्क केला आणि तेसुद्धा यातून जात असल्याचं सांगितलं. लोक याबद्दल फार बोलायचे नाहीत आणि हा त्रास सहन करायचे. कर्करोग झाला यात माझा दोष नाही, मग मी ते लपवून का ठेवायचं?”.

आणखी वाचा – रुबीना दिलैकच्या वडिलांचा अपघात, सफरचंद विकून परतताना दुर्घटना, पाठीमागून कारला धडक दिली आणि…

सोनाली पुढे म्हणाली, “जर तुम्ही आता पाहिलंत तर असं दिसतं की, पूर्वीप्रमाणे लोक आता याबद्दल बोलताना (C) शब्दाचा वापर करत नाही, तर जे आहे त्याच नावाने बोलतात”. पुन्हा शरीरात पसरण्याबद्दल सोनाली म्हणाली, “भीती अजूनही आहेच मी ते नाकारणार, नाही. पण मी नियमितपणे स्कॅन करत असते. काळजी घेत असते. माझ्या बाबतीत असं झालेलं की, कर्करोग झालाय हेच मला फार उशिरा समजलं होतं. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असताना मला याबाबत समजलं होतं, त्यामुळे तुम्ही चेकअप करत राहा. जर तुम्ही वेळीच त्यावर उपचार केले तर त्यातून लवकर बाहेर याल”.

आणखी वाचा – ‘दशावतार’च्या गूढ कथेमागे काय दडलंय?, टिझर पाहून वाढली उत्सुकता, चित्रपटात कलाकारांची मांदियाळी आणि…

सोनाली बेंद्रेला जुलै २०१८ मध्ये ‘मेटास्टॅटिक कॅन्सर’चे निदान झाले होते आणि त्यावर उपचार करण्यासाठी ती न्यूयॉर्कमध्ये गेली होती. कर्करोगाशी यशस्वीपणे लढल्यानंतर, २०२१ मध्ये ती कॅन्सरमुक्त झाली आणि तेव्हापासून ती आपल्या अनुभवांवरुन इतरांना प्रेरणा देत आहेत.

Tags: Cancersonali bendresonali bendre cancer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
shehnaaz gill admitted

शहनाज गिलची प्रकृती बिघडली, उपचारासाठी अभिनेत्री रुग्णालयात दाखल, करणवीर मेहराने दाखविली झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.