शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, घरच्यांनी केलं साग्रसंगीत केळवण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 23, 2024 | 12:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Shivani Sonar pre-wedding rituals started family celebrated her kelvan and she shared special photos social media.

शिवानी सोनारची लगीनघाईला सुरुवात, घरच्यांनी केलं साग्रसंगीत केळवण, फोटो व्हायरल

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजीवनी म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ‘रंग माझा वेगळा’, ‘लोकमान्य’ या मालिकेत झळकलेला अभिनेता अंबर गणपुळेशी शिवानी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या दोघांच्या लग्नाची लगबग सुरू आहे. अभिनेत्री शिवानी सोनारचा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, ९ एप्रिलला अंबर गणपुळेशी साखरपुडा झाला होता. कुठलाही गाजावाजा न करताना शिवानी व अंबरने गुपचूप साखरपुडा केला होता. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. (Shivani Sonar Kelvan)

अशातच अभिनेत्रीच्या लगीनघाईलाही सुरुवात झाली आहे. लग्नाआधी तिच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. घरच्यांनी तिचं ही केळवण साजरं केलं असून याची खास झलक शिवानीने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. या केळवणासाठी शिवानीच्या घरच्यांनी चमचमीत पदार्थांचा बेत केल्याचे दिसून येत आहे. केळवणाच्या जेवणात मांसाहारी जेवणाचाही समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच एका चिमूरड्याने शिवानीचं औक्षण केल्याचे फोटोही लक्ष वेधून घेत आहेत. तसंच एका रुमालावर शिवानीच्या पायांचे ठसेही पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivani Sonar 💜 (@shivani.sonarofficial_)

आणखी वाचा – “गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता”, सुप्रसिद्ध गायकाचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला, “ते चुकून…”

शिवानीने यावेळी घरच्यांबरोबर खास फोटोशूट केलं असून यावेळी लेकीच्या लग्नानिमित्तचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्या बाबांनीई लेकीचे औक्षण केलं. तर शिवानीच्या आजीनेही नातीचे लाड केल्याचे या फोटोंमधून पाहायला मिळत आहेत. “घरचं केळवण/लाड” असं म्हणत शिवानीने हे खास फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोला तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – महिलेचा मृत्यू होऊनही थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ बघत राहिला अल्लू अर्जुन, सीसीटीव्ही फुटेज हाती, पोलिसांचा मोठा खुलासा

दरम्यान, शिवानी व अंबरच्या साखरपुड्याचे फोटो अजूनही चर्चेत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी त्यांनी Bride To Be Party आणि Groom To Be Partyचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता अभिनेत्रीचे केळवणाचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता शिवानी-अंबर कधी एकदा लग्नबंधनात अडकणार? याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Tags: Actress Shivani SonarShivani Sonar KelvanShivani Sonar Kelvan photos
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Abhijeet Bhattacharya on salman khan

‘कुत्र्यासारखा झोपतो…”, सुप्रसिद्ध बॉलिवूड गायकाने सलमान खानला दारुड्या व फालतू म्हणून हिणावलं, इतका राग का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.