मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने नवऱ्याला लग्नापूर्वी घातली ‘ती’ अट, खुलासा करत म्हणाली, “तो माझ्यासाठी गिरगावचं घर सोडून आला आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 21, 2023 | 6:27 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Sharmishtha Raut On Husband

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने नवऱ्याला लग्नापूर्वी घातली 'ती' अट, खुलासा करत म्हणाली, "तो माझ्यासाठी गिरगावचं घर सोडून आला आणि…"

बरेच कलाकार असे आहेत ज्यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. बरं हे कलाकार प्रेक्षकांच्या मनात जागा केल्यानंतर काही काळ सिनेसृष्टीपासून दूर जातात, तेव्हा मात्र प्रेक्षक या कलाकारांना मिस करू लागतात. बऱ्याच दिवसांनी अशीच एक अभिनेत्री पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज होतं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जिने तिच्या खलनायकी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं अशी अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत. (Sharmishtha Raut On Husband)

आजवर शर्मिष्ठा राऊत हिने ग्रे शेड असलेल्या भूमिका साकारल्या. आतापर्यंत शर्मिष्ठाने चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तिच्या कामासोबतच ती बरेचदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. बराच काळ मालिकाविश्वापासून दूर असलेली शर्मिष्ठा राऊत आता पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवायला सज्ज होतं आहे.

दोन बहिणींच्या नात्यातील अतूट गोष्ट सांगणाऱ्या या आशयघन कथेवर आधारित ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सोशल मीडियावर या मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. अशातच मालिकेतील कलाकारांनी नुकतीचमोठ्या गोष्टीबद्दल भाष्य केलं. या निमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी त्याचं गिरगावमधील घर सोडल्याचा खुलासा केला.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी रुग्णालयात दाखल, ‘या’ आजाराशी करतेय सामना

होम मिनिस्टर या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आदेश बांदेकर शर्मिष्ठाला विचारतात, “तुला सगळं ठाण्यातच मिळालं? त्यावर शर्मिष्ठा म्हणते, “हो.” त्यानंतर आदेश बांदेकर विचारतात, “कसं काय पण?” यावर शर्मिष्ठा म्हणते, “माझा नवरा गिरगावचा आहे. जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा माझी अट होती की, मी ठाणे सोडणार नाही. यावर तो म्हणाला होता, नो प्रॉब्लेम. मी ठाण्यात येतो. मग तो गिरगाव सोडून ठाण्यात आला.”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – परिणीती चोप्रा व राघव चड्ढाच्या लग्नाची जोरदार तयारी, तारीख व ठिकाणही ठरलं, कुठे पार पडणार शाही विवाहसोहळा?

शर्मिष्ठा राऊतने २०२० मध्ये तेजस देसाईसह लगीनगाठ बांधली. त्यावेळी शर्मिष्ठा व तेजस यांच्या लग्नसोहळ्याच्या अनेक फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. बरेचदा हे जोडपं सोशल मीडियावरून एकमेकांबद्दलच प्रेम व्यक्त करत असतात.

Tags: entertainmentsara kahi tichyasathisharmishtha rauttejas desai
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Bhau Shared Old Photo with Wife Mamata

ब्लेजर, सूट अन्…; लग्नात असे दिसत होते भाऊ कदम, ‘तो’ फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.