‘बिग बॉस’ फेम सना खान नेहमीच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री राहिली आहे. सोशल मीडियावर सना कायमच चर्चेत असते. सनाने लग्नानंतर व आई झाल्यानंतर सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतला. आता पुन्हा एकदा सना तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे काल सनाने तिच्या मुलाचा चेहरा जगाला दाखवला. ५ जुलै २०२३ रोजी ती आई झाली. आणि आता लेकाच्या एका वर्षानंतर, त्यांनी त्यांच्या प्रिय हाजी सय्यद तारिक जमीलची ओळख करुन दिली आहे. त्यापूर्वी हजशी संबंधित काही हृदयस्पर्शी क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Sana Khan Baby Boy)
इहराममधील त्यांचे सुंदर क्षण टिपत सनाने तिचा मुलगा तारिकचा चेहरा दाखवला. तिने हे फोटो शेअर करत त्याला प्रेमाने ‘आमचा मिनी हज २०२४’ असे म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये तारिकची आई सना खानची जिवलग मैत्रिण आणि भारतीय टेनिस आयकॉन सानिया मिर्झा यांचे बॉण्डिंगही पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सानिया हजच्या एका विधीदरम्यान तारिकबरोबर दिसली. सानियाने या वर्षी हजदेखील केला आहे.
सना खानने या व्हिडीओमध्ये तिच्या मुलाच्या चालण्यापासून त्याच्या हसण्यापर्यंत, खेळण्यापर्यंत आणि झोपण्यापर्यंतच्या सर्व झलक दाखवल्या आहेत. सनाच्या लेकाची झलक पाहून सगळेच त्याच्यावर प्रेम करत आहेत. माजी अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमचे छोटे हाजी २०२४, हे प्रभु, मलाही नमाज अदा करणारा बनवा किंवा माझ्या मुलांमधूनही (असे लोक निर्माण करा जे नमाज करतात) हे आमचे प्रभु”.
सनाने पुढे लिहिले की, “किंवा माझी प्रार्थना स्वीकार कर, कुबुल फार्मा. मला, माझ्या पालकांना आणि जे विश्वास ठेवतात त्यांना क्षमा कर”. यासह तिने असेही सांगितले की, एका टूर अँड ट्रॅव्हल कंपनीने तारिकचा व्हिसा मिळवून दिला आणि तो हजसाठी येऊ शकला. सना खानच्या या पोस्टवर भारती सिंग, किश्वर मर्चंट आणि इतर चाहत्यांनी तिच्या मुलाचे कौतुक केले.