एखादा कलाकार अनेक चित्रपटानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचतो पण काही कलाकारांना एक चित्रपट मेहनतीची संधी देतो आणि त्या संधीच तोच कलाकार सोनं करतो. अशीच एक अभिनेत्री आपल्या मराठी चित्रपटसृष्टी मध्ये आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे रिंकू राजगुरू. आज रिंकूचा वाढदिवस त्या निम्मित जाणून घेऊयात अनेक रेकॉर्डस मोडलेल्या सैराट मध्ये रिंकूची वर्णी कशी लागली.(Rinku Rajguru Sairat)
सैराट या चित्रपटाचे दिगदर्शक नागराज मंजुळे हे एका कामानिमित्त अकलूज येथे गेले होते. त्यावेळी नागराज यांना पाहण्यासाठी रिंकू तिच्या मैत्रिणीं सोबत गेली होती. त्यावेळी रिंकूला पाहून नागराज यांना सैराटच्या कथेसाठी अनुकूल असणारी अभिनेत्री रिंकू मध्ये दिसली आणि त्यांनी तिला सैराट चित्रपटाची ऑफर दिली.
ऑफर दिल्या नंतर रिंकूची फक्त १० मिनिटांची ऑडिशन घेण्यात आली आणि काही दिवसांनी चित्रपटासाठी रिंकूची निवड देखील करण्यात आली.आणि रिंकूच्या सैराट चित्रपटातील तिच्या अभिनयाने तीच वेगळं अस्तित्व निर्माण केलं. रिंकूने साकारलेलं आर्ची हे पात्र देखील चांगलंच गाजलं.(Rinku Rajguru Sairat)
सैराटच्या यशानंतर रिंकू राजगुरू कागर, आठवा रंग प्रेमाचा, मेकअप, अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली होती. सोबतच सोशल मीडियावर अनेक फोटोज रिल्स पोस्ट करत रिंकू नेहमी चर्चेत असते.