Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस’ आणि राखी सावंत हे समीकरण साऱ्यांना माहित आहे. ‘बिग बॉस’मुळे राखी सावंत खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वात राखीने सहभाग घेतला. स्पर्धक म्हणून राखी किती उत्तम आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. अशातच नुकतीच राखी स्पेशल पाहुणी म्हणून ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये आली होती. यावेळी तिने स्पर्धकांसह धमाल-मस्ती केलेली पाहायला मिळाली. प्रत्येक स्पर्धकाशी तिने संभाषण करत त्यांची फिरकी घेतलेली पाहायला मिळाली. यावेळी राखीने निक्कीची चांगलीच पोलखोलही केली. राखीने आता ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
राखीने हा व्हिडीओ शेअर करत सूरजचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं. टिकटॉक स्टार असल्यापासून ते ‘बिग बॉस’स्पर्धक असेपर्यंतचा त्याचा प्रवास पाहणं रंजक ठरत आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला ‘बिग बॉस’च्या घरात मोठी संधी मिळाली आहे. दरम्यान, टिक टॉक स्टार सूरज चव्हाणचा जलवा ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळतोय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या सूरज चव्हाणने टिकटॉक आणि त्यानंतर इंस्टाग्रामवरील आपल्या खास शैलीतील व्हिडीओने धुमाकूळ घातला.
आणखी वाचा – Video : पार्टीत नाचत होता प्रसाद जवादे, बायको न सांगता थेट पोहोचली अन्…; व्हिडीओ व्हायरल
गोलीगत धोका असं खास शैलीत बोलणारा सूरज सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतो. ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर सूरजला प्रेक्षकांचाही भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला. एका छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने स्व मेहनतीने आणि त्याच्या कलेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळेच प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या सूरजचे नाव सर्वत्र घेतलं जाताना दिसते. आता राखीनेही सूरजला भरभरुन पाठिंबा दिलेला पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “मागून कधीच मान मिळवला नाही”, जान्हवीने केलेल्या अपमानावर पॅडी यांचं भाष्य, म्हणाले, “अजूनही माफी नाहीच”
राखीने व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “हॅलो. तुम्ही सगळे कसे आहात?. मी मराठी ‘बिग बॉस’मध्ये गेले होते. तर मला असं वाटतंय की, सूरज चव्हाण निवडून येणार आहे. तोच ट्रॉफी जिंकणार आहे. तोच हा शो जिंकणार आहे. मला सर्व महाराष्ट्राला आणि सगळयांना सांगायचं आहे, की सूरज चव्हाणला वोट करा. भरपूर वोट करा. आपला मुलगाच जिंकून यायला पाहिजे. जस तो बोलतो ते मला आवडतं. तो एकदम निरागस मनाचा आहे. क्युट आहे. त्याला भरपूर वोट करा, तोच जिंकायला हवा. जय महाराष्ट्र. ‘बिग बॉस मराठी’ सूरजला जिंकवा. मेरा सूरज कभी नही डुबेगा और तू जितेगा”, असं म्हणत तिने सूरजचं भरभरुन कौतुक केलं.