शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहे आणि…”, राखी सावंतने रुग्णालयामधून शेअर केला व्हिडीओ, रडत म्हणाली, “प्रार्थना करा कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 18, 2024 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakhi Sawant On Health

"ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहे आणि...", राखी सावंतने रुग्णालयामधून शेअर केला व्हिडीओ, रडत म्हणाली, "प्रार्थना करा कारण..."

गेल्या काही दिवसांत राखी सावंत अधिक चर्चेत आली आहे. सार्वजनिक ठिकाणी ती नेहमी काही ना काही करत चर्चेत असते. अशातच आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत सध्या एका मोठ्या अडचणीतून जात आहे. काही दिवसांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्व चाचण्या झाल्यानंतर राखी सावंतला यूटीएस ट्यूमर असल्याचे आढळून आले. रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. राखीच्या तब्येतीबाबत तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेशने माहिती दिली होती. (Rakhi Sawant On Health)

यानंतर राखी सावंतने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या तब्येतीबाबत सांगितले आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली, ती बाहेर जाणं मिस करत आहे. तसेच पूर्ण कपडे घालण्याची तिला सवय नाही त्यामुळे ती हॉस्पिटलचे कपडे घालायला तिला आवडत नाही. आणि लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचंही सांगितलं.

आणखी वाचा – “तुम्ही खरे साहेब…”, शिवतीर्थावर महायुतीची सभा झाल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाला…

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शस्त्रक्रियेपूर्वीच राखी सावंतचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी हॉस्पिटलमध्ये बेडवरुन वाईट रीतीने रडताना दिसत आहे. राखी तिचे पोट घट्ट धरुन रडत आहे. राखी सावंतवर लवकरच शस्त्रक्रिया होणार असून लवकरच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचे चाहते राखीसाठी सतत प्रार्थना करत आहेत.

आणखी वाचा – “त्यांच्या शेवटच्या दिवसांत…”, वडिलांच्या निधनाला तीन वर्षे होताच ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री भावुक, म्हणाली, “असा बापमाणूस…”

या व्हिडीओद्वारे राखी असं बोलताना दिसत आहे की, “अखेर ती स्टेज आली आहे. मी ऑपरेशन थिएटरमध्ये जात आहे. आजवर मी खूप मोठ्या संकटांचा सामना केला आहे. कृपया सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करा. हे खूप दुःखद आहे. माझा विश्वास आहे की, मी लवकर बरी होईन. माझ्या शरीरात असणाऱ्या ट्युमरला डॉक्टर बाहेर काढतील. आणि मी पुन्हा नाचू, गाऊ लागेन”, असं ती बोलताना दिसत आहे.

Tags: bollywood actressrakhi sawantRakhi Sawant On Healthrakhi sawant surgery
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada marathi serial update adhipati akshara love track see the details

सरगम मॅडमद्वारे अधिपती-अक्षराला कायमचा दूर करण्याचा भुवनेश्वरीचा प्लॅन फसणार, दोघांमध्ये फुलत आहे प्रेम, नात्याला नवं वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.