मंगळवार, जुलै 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या आयुष्यातला हिरो…”, अशोक सराफांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया समोर, निवेदिता सराफ म्हणाल्या, “तुझा प्रवास…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2025 | 11:15 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nivedita Saraf Post

"माझ्या आयुष्यातला हिरो…", अशोक सराफांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया समोर, निवेदिता सराफ म्हणाल्या, "तुझा प्रवास…"

Nivedita Saraf Post : मराठी सिनेसृष्टीत सध्या एकामागून एक आनंदाच्या बातम्या कानावर पडत आहेत. मराठी प्रेक्षकांचे लाडके मामा यांचा नुकताच पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. संबंध देशभरातून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना अभिनयाचा मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांच्या प्रत्येक चाहत्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हातून अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानंतर हा खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत त्यांनी आपल्या भावनादेखील शेअर केल्या आहेत.

आजवर अशोक सराफ यांनी त्यांच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मराठीच नव्हे तर हिंदी भाषेतही आपला ठसा उमटवणारे अशोक मामा लोकप्रिय झाले. या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचा मोलाचा वाटा आहे. स्वतः अभिनेत्री असूनही निवेदिता यांनी अशोक सराफांना त्यांची स्वप्न पूर्ण होण्यास वेळोवेळी सपोर्ट केला. अशोक सराफ यांना दिल्ली येथे पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळीही निवेदिता त्यांच्यासह उपस्थित होत्या.

आणखी वाचा – “अर्धवट माहिती देऊन…”, प्राची पिसाटच्या गंभीर आरोपांवर सुदेश म्हशीलकरांनी सोडलं मौन, म्हणाले, “यामुळे माझं कुटुंब…”

View this post on Instagram

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

पती अशोक सराफ यांना पुरस्कार मिळाल्यानंतर पत्नी निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनाबाहेरील फोटो शेअर करत निवेदिता यांनी ही खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “हा क्षण शब्दात मांडता येणार नाही असा आहे. तुझा प्रत्येक प्रवास, प्रत्येक टप्पा तुझ्या मेहनतीचा, तुझ्या समर्पणाची साक्ष आहे. माझ्या आयुष्यातला हिरो, आता देशाचाही अभिमान! माझा अभिमान अनंत पटीने वाढला आहे. खूप खूप अभिनंदन”.

आणखी वाचा – “माझी मुलगी तर गेली…”, भरल्या डोळ्यांनी हात जोडत वैष्णवीच्या वडिलांची विनंती, म्हणाले, “एखाद्या लेकराबाबत असं…”

पद्मश्री पुरस्कारानंतर अशोक सराफ यांनी आपल्या भावना शेअर करत म्हटलं की, “पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या”.

Tags: ashok sarafentertainmentNivedita Saraf Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Next Post
Singer pawandeep rajan discharged from hospital

अपघातानंतर जवळपास एक महिन्याने घरी परतला पवनदीप राजन, आता परिस्थिती नेमकी कशी?, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.