शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यांनी कधीच मदत केली नाही”, प्रियांका व परिणीती चोप्राबद्दल बहीण मीराचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “एकमेकांशी बोलतही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 24, 2023 | 9:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Meera Chopra On Priyanka and Parineeti Chopra

"त्यांनी कधीच मदत केली नाही", प्रियांका व परिणीती चोप्राबद्दल बहीण मीराचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "एकमेकांशी बोलतही..."

बॉलिवूडमधील बहिणींच्या जोड्यांमध्ये एक जोडी नेहमीच चर्चेत राहिली ती म्हणजे प्रियांका चोप्रा व परिणीती चोप्रा. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही बहिणींची जोडी लक्ष वेधून घेत असते. अशातच त्यांची चुलत बहीण मीरा चोप्राही देखील सिनेविश्वात सक्रिय आहे. बऱ्याच चित्रपटांमधून मीरा प्रेक्षकांच्या भेटीला आली. सिनेइंडस्ट्रीत काम करताना बहिणींकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही, असं मीराने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. (Meera Chopra On Priyanka and Parineeti Chopra)

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मीराने तिला मिळालेल्या म्हणाली, “सुरुवातीपासूनच आमच्यात इतकी जवळीक नव्हती की आमचं नातं मैत्रिणींसारखं वाटू शकेल. मात्र एकाच कुटुंबातील तीन-चार मुली जेव्हा इंडस्ट्रीत काम करतात तेव्हा त्या एकमेकांना मदत करतात. मात्र असं काही माझ्याबाबतीत घडलं नाही. मी कधीही मदत मागितली नाही आणि त्यांच्याकडून कधीही मदत मिळाली नाही. मी मदत मागणारी नाही आणि त्यांनी कधीच मदत केली नाही” असं मीरा म्हणाली.

आणखी वाचा – “पुर्णा आजी कुठे आहे?”, तेजस्विनी पंडितने केला आईच्या तब्येतीबाबत खुलासा, म्हणाली, “ती आजारी होती, दोन आठवडे ICUमध्ये…”

यापुढे मीरा म्हणाली, “आमचे कुटुंबीय एकमेकांशी बोलत नाहीत, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलून माझ्या कुटुंबाला दुखवायचं नाही. मी अजूनही प्रियांकाच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. मला मधु काकींना चित्रपट दाखवायचा आहे. ते सर्वजण माझ्यासाठी खूप खूश आहेत. प्रियांका आणि माझं नातं खूप चांगलं होत, पण आता थोडा बदल झाला आहे. ती खूप मोठ्या मनाची आहे,” असंही मीरा म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Kaali (@meerachopra)

आणखी वाचा – मेहंदी रंगली गं! स्वानंदी टिकेकरच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो पाहिलेत का? रोमँटिक पोज देत शेअर केले नवऱ्याबरोबरचे फोटो

लहानपणी त्यांचं सर्व कुटुंबीय एकाच घरात राहायचे. “पण जेव्हा एखादी व्यक्ती खूप यशस्वी होते, तेव्हा इतरांना फार महत्त्व देत नाहीत, कमी लेखू लागतात,” असं मीरा म्हणाली. मीराचं प्रियांकाच्या कुटुंबाशी चांगलं नातं आहे. प्रियांका व निक जोनासच्या लग्नालाही तिने हजेरी लावली होती. मात्र परिणीती चोप्रा व त्यांच्या कुटुंबियांशी ते बोलत नाहीत.

Tags: entertainmentmeera chopraparineet choprapriyanka chopraPriyanka chopra cousin
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Disha parmar Daughter

दिशा परमार व राहुल वैद्यच्या लेकीची पहिली झलक आली समोर, नाताळचं औचित्य साधत आईनेच मुलीचा चेहरा दाखवला आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.