बालपण हे प्रत्येकासाठी खास असत. जस जस मोठे होत जातो. बालपणीच्या आठवणी जास्त आपल्याशा वाटतात. फोटोज हा त्या आठवणी जपण्याचा एक उत्तम पर्याय आहे. हेच फोटो कधी तरी हाताशी लागतात. आणि पुन्हा बालपणात घेऊन जातात.लहानपणीच्या त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो.(Manasi Naik Childhood Photos)

कलाकारांना त्यांच्या कामासाठी कायमच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत.पडद्यामागे ही कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रेक्षकांशी एक वेगळं नातं निर्माण करतात.कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांचे, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक क्षण शेअर करत असतात.

पाहा मानसी नाईकचे लहानपणीचे फोटो(Manasi Naik Childhood Photos)

त्याच सोबत सध्या अनेक कलाकार त्यांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करताना पाहायला मिळत आहेत.अशातच सगळ्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनेत्रीने तिच्या लहानपणीच फोटो शेअर केला आहे. चला बघूया या अभिनेत्रींच्या बालपणीच्या फोटोंची खास झलक.

ही आहे अभिनेत्री मानसी नाईक. अभिनयासोबतच मानसीने तिच्या नुर्त्यशैलीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.जबरदस्त या चित्रपटातून मानसीने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.त्या नंतर मानसीने बरेच चित्रपट केले. चित्रपटांसोबत अलबम सॉंग्स मधल्या मानसीच्या नृत्याने तिला ओळख मिळवून दिली.वाट बघतोय रिक्षावाला या गाण्याने मानसी नाईक घराघरात पोहचली.मानसी तिच्या हटके अदाकारीमुळे कायम प्रेक्षकांच्या नजरेत राहते. तसेच सध्या मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील विशेष चर्चेत होती.काही दिवसांपूर्वी मानसीने नवीन घर घेतलं. त्याचे फोटोज देखील तिने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.त्या फोटोजवर देखील कमेंट करून प्रेक्षकांनी मानसीला शुभेच्छा दिल्या होत्या.(Manasi Naik Childhood Photos)

हे देखील वाचा : भावंडांना ऐअरपोर्ट वर बघून पूजा सावंतला अश्रू अनावर