सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही तिच्या अभिनयाने कायमच चर्चेत राहत असते. मात्र अभिनेत्री तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियाद्वारेही नेहमीच सक्रीय राहत असते. क्रांती व तिच्या मुलींचे रिल्स तर सोशल मीडियावर बरेच प्रसिद्ध आहे. अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमधून क्रांतीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. पण तिच्या मुलींच्या जन्मानंतर क्रांतीने सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी ती सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असते. आपल्या लेकींशिवाय ती नवऱ्याबरोबरचे काही फोटो व व्हिडीओदेखील शेअर करत असते.
क्रांतीने शेअर केलेला हा नवीन व्हिडीओ तिचा किंवा तिच्या लेकींचा नसून क्रांतीच्या पतीचा म्हणजेच समीर वानखेडे यांचा आहे. क्रांतीने समीर वानखेडेंबरोबरच्या देवदर्शनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. क्रांती रेडकर पतीसह अंबाबबाईच्या देवदर्शनासाठी गेले असून याचे काही खास क्षण तिने शेअर केले आहेत. “महालक्ष्मी माते की जय” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. तसेच तिने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
या व्हिडीओमध्ये क्रांतीने दर्शन घेताना डोक्यावर पदर घेतल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी क्रांतीचे व तिच्या नवऱ्याच्या या कृतीबद्दल कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी तिच्या संस्कारांचंही कौतुक केलं आहे. या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “दर्शन करताना साहेबांनी कपाळावरील चष्मा काढला आणि आपण डोक्यावर पदर घेतला. खूप छान”, “खुप सुंदर”, “श्री महालक्ष्मी माता की जय”, “कोल्हापुरात आपले स्वागत” अशा अनेक कमेंट्स करत क्रांतीच्या या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, क्रांतीने अधिकारी समीर वानखेडे यांच्याबरोबर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. तिने ‘जत्रा’, ‘खो-खो’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटांमधून क्रांती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.