गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अस्खलित मराठी बोलली, आईची साडी नेसून पुरस्कार स्वीकारला आणि…; वाढदिवसादिवशी काजोल भावुक, म्हणाली, “माझी आई…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 6, 2025 | 10:44 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi movie awards

अस्खलित मराठी बोलली, आईची साडी नेसून पुरस्कार स्वीकारला आणि…; वाढदिवसादिवशी काजोल भावुक, म्हणाली, "माझी आई…"

marathi movie awards : यंदा ६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री काजोल देवगणला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५ ऑगस्ट रोजी ५१ वा वाढदिवस साजरा करत असणाऱ्या काजोलसाठी हा पुरस्कार सोहळा दुहेरी आनंद घेऊन येणारा ठरला. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना काजोलसमोर तिची आई म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री तनुजादेखील उपस्थित होत्या.

पुरस्कार स्वीकारल्यावर काजोल म्हणाली, “आज माझा वाढदिवस आहे आणि आजच्या खास दिवशी माझा सन्मान करण्यात आला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या मंचावर सगळे दिग्गज उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हे माझे भाग्य आहे. खरंतर मी निःशब्द झाले आहे, मला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाहीये, हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. याचं सगळ्यात मोठे कारण म्हणजे माझी आई इथे माझ्याबरोबर आलीये. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी तिची साडी नेसून आज या कार्यक्रमाला आली आहे. ही माझ्या आईची साडी आहे”.

आणखी वाचा – “सर्व दोषांसह स्वीकारुन लग्न करणं अवघड”, नवऱ्याबद्दल बोलताना हिना खान ढसाढसा रडली, म्हणाली, “हा माझ्यासाठी…”

अभिनेत्री काजोल देवगण यांना ‘स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४’ ने सन्मानित केल्यानंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले. #महाराष्ट्र_राज्य_मराठी_चित्रपट_पुरस्कार #Maharashtra #AshishShelar pic.twitter.com/VVyz3RbOkQ

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 5, 2025

पुढे काजल म्हणाली, “हा पुरस्कार यापूर्वी माझ्या आईला देखील मिळाला होता आणि आज तोच पुरस्कार मला मिळतोय यापेक्षा मोठा अवॉर्ड दुसरा काय असणार? मी सर्वांची खूप-खूप आभारी आहे. थैंक्यू. आपण काहीतरी आयुष्यात करुन दाखवलं आहे, यावर कसा विश्वास ठेवायचा? मला वाटतं, हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी हे नक्की म्हणू शकेन की, मी आयुष्यात काहीतरी केलं आहे”.

आणखी वाचा – कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करने गाठलं स्वयंपाकघर; पहिल्यांदाच बनवली ‘ही’ खास डिश, सासऱ्यांकडून कौतुक

याशिवाय या सोहळ्यात राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना प्रदान करण्यात आला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला. तसंच, चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात आला.

Tags: entertainment newskajolmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
kannada actor santhosh balaraj dies

दाक्षिणात्य सिनेविश्वाला मोठा धक्का, सुप्रसिद्ध अभिनेत्याचे ३४ व्या वर्षी निधन, कावीळ झाली आणि उपचारादरम्यानच…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.