kannada actor santhosh balaraj dies : दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकामागून एक कलाकारांच्या मृत्यूमुळे संपूर्ण सिने इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अशातच आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आली. कन्नड अभिनेता संतोष बलराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते अन्निकल बलराज यांचा मुलगा संतोष बलराज कावीळ या आजाराशी झगडत होते. कर्नाटक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरु होते आणि उपचारादरम्यानच त्यांनी शेवटचा श्वास घेतला असल्याचं समोर आलं.
संतोष बलराजच्या आधी, फिश वेंकट, कोटा श्रीनिवास राव, बी.सी. सरोजा देवी आणि विष्णू प्रसाद सारख्या अभिनेत्यांचे निधन झालेले पाहायला मिळाले. संपूर्ण चित्रपट उद्योगात शोक व्यक्त केला जात आहे आणि त्यांच्या निधनाने प्रत्येकाला धक्का बसला आहे. संतोष बलराज यांना कुमारस्वामी लेआउट, कर्नाटक येथील सागर अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
आणखी वाचा – अस्खलित मराठी बोलली, आईची साडी नेसून पुरस्कार स्वीकारला आणि…; वाढदिवसादिवशी काजोल भावुक, म्हणाली, “माझी आई…”
असे सांगितले जात आहे की, त्यांच्यावर उपचारांचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. संतोष बलराजच्या कुटुंबात आता फक्त विधवा आई आहे. त्याचे वडील अन्निकल बलराज यांचे १५ मे रोजी २०२२ मध्ये निधन झाले. त्यांनी रस्त्याच्या अपघातात त्यांचा जीव गमावला. संतोष बलराजच्या मृत्यूमुळे चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
आणखी वाचा – “सर्व दोषांसह स्वीकारुन लग्न करणं अवघड”, नवऱ्याबद्दल बोलताना हिना खान ढसाढसा रडली, म्हणाली, “हा माझ्यासाठी…”
संतोष बलराजच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर, २००९ मध्ये आलेल्या ‘केम्पा’ या चित्रपटासह अभिनय विश्वात पदार्पण केले, परंतु २०१५ च्या ‘गणप्पा’ या चित्रपटातून त्याला खऱ्या अर्थाने यश मिळाले. यानंतर तो बर्याच चित्रपटांमध्ये दिसला. संतोष बलराजचा शेवटचा चित्रपट ‘सत्यम’ हा होता, जो २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला कोणत्याच कामाची कमतरता नव्हती, आणि त्याच्या कारकिर्दीत तो चांगली कामगिरीही करत होता, परंतु त्याच्या नशिबात काहीतरी वेगळेच होते.





