Hema Malini On Sunny Deol And Bobby Deol सिनेसृष्टीमध्ये अनेक कलाकार सध्या लग्नबंधनात अडकले आहेत. अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकला.परंतु या लग्नात धर्मेंद्र यांची पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली ईशा आणि आहना हजर नव्हत्या. त्याच्या विशेष चर्चा रंगल्या आहेत.हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत.हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली धर्मेंद्र यांची पहिली पत्नी आणि कुटुंबापासून सुरवाती पासूनच एक अंतर ठेवून असतात आणि म्हणूनच घरातलं लग्न असूनही त्या या लग्नाला हजर नव्हत्या असं म्हंटल जात होतं.पंरतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हेमा यांनी यासांदर्भात भाष्य केले आहे.(Hema Malini On Sunny Deol And Bobby Deol)
पाहा काय म्हणाल्या हेमा मालिनी? (Hema Malini On Sunny Deol And Bobby Deol)
सध्या सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे, सनी देओलची सावत्र बहीण अभिनेत्री इशा देओलने ‘गदर २’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनींग आयोजित केले होते.यावेळी ती तिच्या दोन भावंडांसोबत दिसली होती. याविषयी विचारलं असता हेमा म्हणाल्या, “मला खूप आनंद झाला आणि यात मला काही नवीन वाटत नाही. कारण ही खूप सर्वसामान्य गोष्ट आहे. अनेकदा ते आमच्या घरी येतात. पण त्याविषयी कधी कुठे छापलं जात नाही. आम्ही भेटीगाठीनंतर लगेच फोटो काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत नाही. आमचं कुटुंब तसं नाही.” असं त्यांनी सांगितलं.
पुढे हेमा म्हणल्या,”आम्ही सर्वजण नेहमी एकत्र असतो. कोणतीही समस्या असली तरी आम्ही नेहमी एकमेकांबरोबर असतो. स्क्रिनिंगच्या वेळी ते सर्वांना दिसलं.आमचं कुटुंब वेगळं झालंय असं दाखवण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात, पण तसं काहीच नाही,असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही एक संपूर्ण कुटुंब म्हणून कायम एकत्र आहोत. काही कारणास्तव आम्ही करणच्या लग्नाला उपस्थित राहू शकलो नव्हतो. पण, तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. सनी आणि बॉबी हे सुरूवातीपासूनच रक्षाबंधननिमित्त आमच्या घरी येतात” असं हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलं.

हे देखील वाचा: फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेने केस का कापले?, स्वतःच सांगितलं कारण, म्हणाला, “त्यावेळी रडलो पण…”
धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीसोबत असलेल्या कटू संबंधामुळे त्यांनी ठरवून या लग्नाला येणं टाळलं अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या. पंरतु आता हेमा यांच्या या स्पष्ट उत्तराने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.(hema malini)