सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख. रितेश व जिनिलिया दोघांच्या बॉण्डिंगचे लाखो चाहते दिवाने आहेत. बॉलिवूडसह मराठीमधील एक आदर्श जोडपं म्हणून बरेचदा या जोडीचं उदाहरण दिलं जातं. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ते ओळखले जातात. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. (Genelia Deshmukh On children)
सिनेसृष्टीत रितेश व जिनिलीया यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यांच्यावरील संस्कारांचे प्रत्येकवेळी सर्वत्र कौतुक होते. रियान व राहील अशी त्यांना दोन मुलं आहेत. मुलं झाल्यावर जिनिलीयाने काही वर्ष अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत संसाराकडे विशेष लक्ष दिलं. देशमुख कुटुंब हे बरेचदा चर्चेत असतं. जिनिलीया व रितेश हे त्यांच्या मुलांबरोबरचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट करताना दिसतात.

जिनिलीया व रितेशच्या दोन्ही मुलांना खेळाची प्रचंड आवडही आहे. रियान व राहील दोघांनाही फुटबॉलची आवड आहे. फुटबॉल खेळण्याकडे दोघांचा कल असतो. अनेकदा ते फुटबॉल खेळताना दिसतात. जेनेलिया त्यांचे खेळतानाचे अनेकदा व्हिडीओ शेअरही करताना दिसते. आई म्हणून जेनेलिया त्यांच्या मुलांकडे विशेष लक्ष देताना दिसते. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हे पाहायला मिळतं. अशातच जेनेलियाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रियान व राहील यांच्या खेळाचं श्येड्युल सांगितलं आहे.
आणखी वाचा – मोठी बातमी! ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, कारणही आलं समोर
“पाऊस, सकाळी ६ वाजता उठणं, ७ वाजता फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जाणं, मुलांना या मैदानात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मुलं प्रयत्न करत आहेत यामुळे इतर काहीही यापुढे शुल्लक आहे”, असं कॅप्शन देत दोन्ही मुलांचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन जेनेलिया तिच्या मुलांना विशेष वेळ देताना दिसत आहे. त्यांच्या संगोपनात तिचं विशेष लक्ष असलेलं पाहायला मिळत आहे. जेनेलियाच्या या साधेपणाचे नेहमीच नेटकऱ्यांकडून कौतुकही झालं आहे.