‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत आलेल्या रंजक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्यात बहरणार प्रेम पाहायला मिळत आहे. दोघांनीही एकमेकांसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. अशातच आता मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. अक्षरा व अधिपती यांची मालिकेत लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा अगदी थाटामाटात साजरी होताना पाहायला मिळणार आहे. (aishwarya narkar and avinash narkar dance)
यंदाची ही वटपौर्णिमा अक्षरा व अधिपतीसाठी खूप खास असणार आहे. कारण वटपौर्णिमेचे औचित्य साधत एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अधिपती व अक्षरा यांनी नुकतीच त्यांच्या नव्या नात्याला सुरुवात केली आहे. यानिमित्ताने त्यांचं ‘वटपौर्णिमा विशेष गाणं’ प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘नवरा हाच हवा!’ असे गाण्याचे नाव आहे. या गाण्यात अक्षरा वडाची पूजा करून अधिपतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असल्याचं दिसत आहे.
‘नवरा हाच हवा’ या गाण्याची भुरळ आता नारकर कपलला पडली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांनी ‘नवरा हाच हवा’ या गाण्यावर ठेका धरला आहे. नारकर कपल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. ट्रेंडिंग रीलवर ते नेहमीच काही ना काही शेअर करताना दिसतात. ऐश्वर्या व अविनाश यांचा हा डान्स साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शिविली आहे. या व्हिडीओवर शिवानी रांगोळेने ‘खूप गोड’ अशी कमेंटही केली आहे.
ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनयाबरोबरच त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अनेक ट्रेंडिंग रीलवरुन त्यांना ट्रोलही करण्यात आलं आहे. नेहमीच त्या या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसतात.