आजही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला प्रेक्षक मिस करताना दिसत आहेत. सुशांत या जगात नाही हे दुःख आजपर्यंत त्याचे कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि चाहते विसरु शकलेले नाहीत. सुशांतच्या आकस्मिक निधनाने लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळेच अनेक प्रकारच्या अफवांनाही जन्म दिला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ज्या घरात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला त्या घरातही अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे तिथे राहण्याचा विचारही इतर कोणाला करणं अशक्य झालं होतं. (Adah Sharma Sing Shree Ram Bhajan)
मात्र, आता अभिनेत्याच्या मृत्यूनंतर तब्बल चार वर्षांनी अभिनेत्री अदा शर्मा त्या घरात राहायला आली आहे. या अभिनेत्रीने सुशांत राहत असलेली अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. अभिनेत्रीने येथे राहण्याचा अनुभवही सांगितला आहे. तसेच शिफ्ट होण्यापूर्वी अदाने सुशांतच्या पूर्वीच्या घरात कोणते बदल केले आहेत हेदेखील समोर आले आहे. अशातच अदाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हायरल व्हिडीओमध्ये अदा देवघराच्या बाजूला पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये बसलेली दिसत आहे. आणि ती भजन गात आहे. यावेळी अभिनेत्री श्री राम यांचे भजन गाताना दिसत आहे. मराठी भाषेतील हे भजन गात अदाने देवघराला प्रसन्न करुन सोडले आहे. या व्हिडीओमध्ये अदाने तिचं हे देवघर पांढऱ्या संगमरवराने सजवलेले दिसत आहे.
सुशांत जेव्हा एका अपार्टमेंटमध्ये राहत होता, तेव्हा तो त्यासाठी दरमहा साडेचार लाख रुपये भाडे देत असे. त्याने आपले घर आधुनिक इंटेरिअरने सजवले होते. चामड्याच्या सोफ्यापासून गडद आणि हलक्या रंगाच्या भिंती, रंगीत पेंटिंग्ज, फ्रेम केलेली चित्रे आणि लाकडी वस्तू यांनी त्या वस्तूला सजवलं होतं. सोशल मीडियावर आलेल्या माहितीनुसार, अदा शर्मा चार महिन्यांपूर्वी या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली होती. या घराच्या सर्व भिंती पांढऱ्या रंगाच्या ठेवल्या असून सर्व खोल्यांमध्ये फारच कमी फर्निचर आहे. नृत्य आणि संगीत प्रेमी अभिनेत्रीने वरच्या मजल्यावर संगीत व नृत्य स्टुडिओ बांधला आहे. आणि छतावर अतिशय सुंदर टेरेस गार्डनही तयार केले.
अदाने तिच्या मुलाखतीदरम्यान या घरादरम्यान भाष्य केले. यावेळी बोलताना ती म्हणाली की, अनेकांनी तिला त्या घरात जाण्यापासून रोखले होते. मात्र, तिने तिचा निर्णय घेतला होता. तिने सांगितले की, त्याला अपार्टमेंटमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा वाटली. पांढरा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो. हा रंग मन आणि शरीर शांत करण्यास मदत करतो. पांढऱ्या भिंती, सूर्यप्रकाश यामुळे या घराच्या खोल्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवते.