शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयवर्ष जवळपास ८०, नीट चालताही येत नव्हतं तरीही…; संकर्षण कऱ्हाडेच्या चाहत्यांच्या ‘त्या’ कृतीचं कौतुक, अभिनेताही भारावला

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 12, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade Fans

वयवर्ष जवळपास ८०, नीट चालताही येत नव्हतं तरीही…; संकर्षण कऱ्हाडेच्या चाहत्यांच्या 'त्या' कृतीचं कौतुक, अभिनेताही भारावला

Sankarshan Karhade Fans : मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण कऱ्हाडेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आजवर संकर्षणने मालिका, चित्रपट, नाटक यांमधून महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावरही संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच आता संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा एक व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये संकर्षणला भेटायला दोन वयोवृद्ध आजी आल्याचं दिसत आहे. त्याने ही फॅन मुमेंट शेअर करत त्याचा हा अनुभव इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

संकर्षणला नाटकाच्या प्रयोगादरम्यान ८० च्या आसपास असलेल्या दोन वयोवृद्ध आजी भेटायला आल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे त्या नाटकासाठी नाही तर फक्त संकर्षणला भेटण्यासाठी आल्या होत्या. संकर्षणने त्यांच्याशी गप्पा मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून त्या आजी, “तुझ्या कविता खूप छान असतात, विशेषतः तुझी आईवरची कविता आम्हाला खूप आवडली”, असं म्हणताना दिसत आहे. संकर्षणने त्यांना नाटक पाहण्यासाठी थांबता का असं विचारताच त्यांनी आम्हाला उशीर होईल असं सांगितलं.

आणखी वाचा – “प्रेग्नेंट होस्ट नको कारण…”, इंडियन आयडॉल रिऍलिटी शोबाबत अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “भारतीय प्रेक्षक…”

View this post on Instagram

A post shared by Sankarshann G Karhade (@sankarshankarhade)

परंतु, तेव्हा त्यांच्यासह आलेल्या एका व्यक्तीने सांगितलं की, “आमचं एक वृद्धाश्रम आहे, तिथल्या या आजी आहेत”. पुढे त्या दोन आजींनी सांगितलं की, “आम्हाला केवळ तुला भेटायचं होतं, कधीपासून आमची इच्छा होती”. संकर्षणने पुढे या आजींना चहा वगैरे घेणार का असं विचारलं असता त्यांनी त्यालासुद्धा नकार दिला. आणि जाईपर्यंत त्या एकच म्हणत होत्या, “आम्हाला काही नको फक्त तुला भेटण्यासाठी म्हणून इथे आलो”, असं सांगितलं. संकर्षणचा हा व्हिडीओ पाहून फॅन मुमेंटचा अनुभव येतोय.

आणखी वाचा – चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, जोरात मारलं आणि…; बॉलिवूड अभिनेत्रीकडून भयानक घटनेचा खुलासा, म्हणाली, “माझा पाठलाग करत…”

हा व्हिडीओ शेअर करत संकर्षणने कॅप्शन देत म्हटलं की, “आज पुण्यात ‘नियम व अटी लागू’ प्रयोगाआधी दोन आजी माझ्याकडे आल्या. दोघीही वयाने ८० आसपास असतील. मला वाटलं प्रयोगाला आल्या असतील. तर म्हणाल्या, “आम्ही वृद्धाश्रमात राहातो आम्हाला वेळत परत गेलं पाहिजे आणि तीन तास आम्ही तब्येतीमुळे बसू शकत नाही पण तुला फक्त भेटायला आलो आहे. भरभरुन बोलल्या. आशीर्वाद दिले आणि निघून गेल्या. फक्त भेटीसाठी रिक्षा करुन आल्या होत्या. मी मुद्दाम जाताना त्यांना माझ्या गाडीने पाठवलं. फार गोड वाटलं”. हा व्हिडीओ पाहून चाहते संकर्षणच भरभरुन कौतुक करत आहेत. आणि त्याच्या व्हिडीओला पसंती दर्शवित आहेत.

Tags: entertainmentmarathi actorSankarshan Karhade Fans
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Tejaswini Pandit Raj Thackeray

"राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…", तेजस्विनी पंडितच भाष्य, म्हणाली, "स्वतःच्या कुटुंबापेक्षाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.