तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कानात एकदा तरी घुमलेला आणि प्रत्येकाच्या ओळखीचा आवाज म्हणजे ‘ सचिन सचिन….’. भारतीय क्रिकेट मध्ये मानाचं नाव म्हणजे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर. आज सचिनचा ५० वा वाढदिवस. अनेक भारतीयांचं लहानपण हे सचिन तेंडुलकरची प्रत्येक मॅच बघून आनंदात गेलं आहे. सचिन म्हणलं कि शतक हे समीकरण जणू ठरलेलं असायचं. आज वाढदिवसानिम्मित जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, दिगदर्शक, लेखक प्रवीण तरडे हे देखील सचिनचे खूप मोठे फॅन असल्याचं सांगून एक किस्सा शेअर केला आहे.(Pravin Tarde Sachin Tendulkar incident)
बलोच या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी त्यांनी हा किस्सा सांगितलं आहे. प्रवीण यांनी सांगितले कि त्यांना लहानपणापासून सचिनच्या क्रिकेटचे वेड आहे. भारताच्या एका मॅच दरम्यान प्रवीण यांचे १२वी चे पेपर चालू होते पण मॅच असल्यामुळे प्रवीण १२वीचा पेपर सोडून घरी आले होते. प्रवीण म्हणाले त्यांचं असं मानानं होत कि मी मॅच बघितली नाही तर सचिन लवकर आऊट होणार म्हणून त्यांनी एक ही मॅच सोडली नाही.
प्रवीण तरडे यांचं क्रिकेट आणि सचिन प्रेम हे त्यांच्या या कृतीतून दिसून येत.
हे देखील वाचा – ‘तब्बल ६० वर्षांनी कोठारे कुटुंबात कन्यारत्न जन्मास आलं आणि…’

मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव यांसारख्या दमदार चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्या नंतर आता लवकरच प्रवीण तरडे यांचा ‘बलोच’ हा पानिपतच्या युद्धानंतरची परिस्थती मांडणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गाजलेल्या युध्दांमधली एक लढाई आपण सगळ्यांनीच लहानपणा पासून ऐकली असेल ती म्हणजे ‘पानिपतची लढाई’. पानिपतच्या लढाईत मराठयांचा झालेला पराभव सुद्दा एक क्रांती होती असं म्हणणारा हा चित्रपट आहे.(Pravin Tarde Sachin Tendulkar incident)