सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शेवटचे फक्त ४० दिवस अन्…; मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला पाहून जितेंद्र यांना अश्रू अनावर, भेटायला गेले आणि…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 6, 2023 | 12:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actor jitendra meet junior mehmood and started crying after see his friends condition

शेवटचे फक्त ४० दिवस अन्…; मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला पाहून जितेंद्र यांना अश्रू अनावर, भेटायला गेले आणि…

हिंदी सिनेसृष्टीत ज्युनिअर महमूद या नावाने लोकप्रिय असलेले अभिनेते गेले काही दिवस एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. ९० च्या दशकापर्यंत आपल्या अभिनयाने हिंदी सिनेविश्व गाजवलेले हे अभिनेते सध्या पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. अभिनेते जॉनी लिवर हे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेले होते. त्यानंतर महमूद यांच्या आजाराचे वृत्त समोर आले. जॉनी लीवर यांच्यानंतर मास्टर राजूदेखील त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. तेव्हा ज्युनिअर महमूद यांनी सचिन पिळगावकर व जितेंद्र यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. (Jitendra Met Junior Mehmood)

नुकतीच सचिन पिळगावकर यांनी ज्युनिअर महमूद यांना भेट घेतली असल्याचं सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत सांगितलं. या पोस्टद्वारे त्यांनी “मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी गेलो होतो. पण ते झोपले असल्यामुळे आमची भेट झाली नाही. काही दिवसांपूर्वी मी त्यांच्याबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता. मी त्यांच्या मुलाच्या संपर्कात असून त्यांच्या तब्येतीविषयी जाणून घेत आहे.” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी महमूद यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचेदेखील आवाहन केले आहे.

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात उपेंद्र लिमयेंना करायचं नव्हतं काम, अभिनेत्याचा पहिल्यांदाच मोठा खुलासा, म्हणाले, “नकार दिला आणि….”

अशातच जितेंद्रना त्यांच्या तब्येतीचे कळताच ते त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईच्या घरी गेले आहेत. जितेंद्र यांनी महमूद यांची अवस्था पाहताच त्यांना अश्रु अनावर झाले. या भेटीचे काही फोटो समोर आले असून या फोटोमध्ये जितेंद्रना त्यांच्या मित्राची अस्वस्था बघून दु;ख झाले आहे. यावेळी त्यांच्याबरोबर जॉनी लीवर हेदेखील होते. ज्युनिअर महमूद यांनी जितेंद्र यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि तेव्हापासून त्यांची मैत्री आहे.

आणखी वाचा – Video : अडीच रुपयाचा वडापाव, तेच वर्ग अन्…; स्वतःच्या शाळेमध्ये पोहोचला सिद्धार्थ चांदेकर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “डोळे भरुन आले आणि…”

दरम्यान, महमूद हे गेले अनेक दिवस आजारी असून त्यांना दोन महिन्यांपूर्वी पोटाचा कॅन्सर झाल्याचे समजले. हा कॅन्सर त्यांच्या यकृत व फुफ्फुसात पसरल्याचे समोर आले आहे. महमूद यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांच्याकडे फक्त ४० दिवस शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags: bollywood actorbollywood newsentertainmentjunior mehmood
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Suruchi Adarkar Piyush Ranade Marriage Marathi News

Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding : लग्नबंधनात अडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर, शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.