दादा कोंडके म्हणजे शिस्त असं जुनी लोक आज ही अगदी हक्कानं सांगतात. दादांच्या शिस्तीचे अनेक किस्से सांगितले जातात. गावोगावी ‘ विच्छा माझी पुरी करा ‘ हे दादांचं लोकनाट्य तुफान चाललेलं. अगदी विदर्भातून ते रत्नागिरीपर्यंत चर्चा असलेलं दादांचं हे लोकनाट्य एवढं गाजलं कि राजकारणी लोकांपासून ते अगदी इतर कलाकारांपर्यंत सगळ्यांना या नाटकाची भुरळ पडली होती. लोकनाट्य झाल्यावर जेवढं कौतुक तेवढीच ती लोक नाव ठेवायची ज्यांना दादांचा कार्यक्रम मिळत न्हवता. त्यासंदर्भात एक भन्नाट किस्सा दादांच्या एका निकटवर्तीयांनी सांगितला होता.(Dada kondke’s disrespect incident)
एकदा एका कार्यक्रमात दादांच्या मित्राने रत्नागिरीत १ मे ला ‘विच्छा माझी पुरी’ करा या लोकनाट्याचा कार्यक्रम हवा होता अशी मागणी केली. पण तेव्हा मात्र दादांचे विदर्भात प्रयोग ठरले होते. दादांनी रत्नागिरीत १ मे नंतर प्रयोग केला तर चालणार नाही का असं विचारलं त्यावर दादांचा मित्र भिसे त्यांना म्हणाला नाही दादा माझ्या साप्ताहिकाचा वर्धापन दिन आहे त्या निम्मित कार्यक्रम हवा आहे. त्याखातर दादांनी लोकनाट्याचे लेखक वसंत सबनीस यांना सांगितले कि विदर्भातील सगळे कार्यक्रम रद्द करा माझे जवळचे मित्र आहेत त्यांना रत्नागिरीत प्रयोग हवा आहे. आणि प्रयोग ठरवा असं दादांनी त्यांच्या मित्राला सांगितलं. सोबतच दादा त्यांना म्हणाले आता तुम्ही परत जाताना पुण्यातून माझ्या कार्यालयातून नाटकाचे पोस्टर्स घेऊन जावा पूर्ण रत्नागिरीत जाहिरात करा आणि कार्यक्रम ठरला याची तयार मला पाठवा. मित्राच्या शब्दाखातर दादांनी हे सगळं केलं खरं पण पुढे घडलं भलतंच.

कार्यक्रम न दिल्यामुळे(Dada kondke’s disrespect incident)
दादा कोंडके यांनी सांगितलेलं पोस्टर घेऊन जाण्याचं काम न करता कशाला हवे आहेत पोस्टर्स वैगरे आपण करू जाहिरात या आविर्भावात पोस्टर न घेताच रत्नागिरी गाठली. रत्नागिरीत पोहचल्यावर त्यांच्या मित्राने जाहिरातीचं सोडा पण दादांना कार्यक्रम निश्चित झाल्याची तार त्याने ४ दिवस आधी कळवली दादांनी अगदी नम्र पणे त्याला कळवले कि ‘ अनेक दिवस तुमच्याकडून कार्यक्रम निश्चित झाल्याचं न कळल्यामुळे अन्य ठिकाणी कार्यक्रम घेतले व ठरवले. आता १ मे नंतर कधी कार्यक्रम ठरवू पण १ मे ला कार्यक्रम शक्य नाही.(Dada kondke’s disrespect incident)
हे केल्यावर दादांच्या मित्राने मात्र कार्यक्रम न झाल्याचं सार खापर दादांवर फोडलं आणि त्याच्या साप्ताहिकातून दादांची बदनामी केली. पण झालं उलटंच म्हणतात ना चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळत दादांसोबत अगदी तसेच झालं बदनामी साठी लिहिलेलं साप्ताहिक हे दादांच्या प्रसिद्धीचं आणखी एक कारण बनलं. रत्नागिरीतील दादांची लोकप्रियता कमी न होता आणखी वाढली आणि दादांच्या लोकनाट्याचे रत्नागिरीत नंतर ४ प्रयोग झाले.