शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘काशीपुरवाले बाबा निराला’ पुन्हा परतणार, ‘आश्रम ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “काही भाग…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 26, 2024 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aashram series season four

‘काशीपुरवाले बाबा निराला’ पुन्हा परतणार, 'आश्रम ४' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, "काही भाग..."

मनोरंजन क्षेत्रामध्ये सीरिजचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे.ओटीटीवर आजवर आलेल्या प्रत्येक सिरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. यातील एक दमदार सीरिज म्हणजे ‘आश्रम’. २०२० साली या सिरिजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विषय वेगळा असल्याने या सीरिजला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. पहिल्या भागाच्या यशानंतर या सीरिजचे अजून दोन भाग प्रदर्शित करण्यात आले. या भागांनादेखील प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. आता ‘आश्रम’चा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची अपडेट समोर आली आहे. (aashram series season four)

‘आश्रम’च्या माध्यमातून अभिनेता बॉबी देओल प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये बॉबीने केलेल्या भूमिकेला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तो ‘ॲनिमल’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसला. केवळ काही मिनिटांच्या भूमिकेने त्याने सर्वांचीच मने जिंकून घेतली. आता पुन्हा एकदा ‘आश्रम’मध्ये दमदार भूमिकेत दिसू शकतो अशी शक्यता आहे. या सीरिजमध्ये बाबाचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भोपा स्वामी’ची भूमिका करणारे चंदन रॉय यांनी याबद्दल मोठा खुलासा केलं आहे. एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, “प्रत्येक जण मला ‘आश्रम’च्या चौथ्या सीझनबद्दल विचारत असतो. त्यांना वाटते की सर्व तयारी झाली असून या वर्षी हा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.”

आणखी वाचा – मुलगी पायलट तर लेक करणार चित्रपटांचं दिग्दर्शन, शरद पोंक्षेच्या मुलाची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, वडिलच साकारणार मुख्य भूमिका

View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

पुढे तो म्हणाला की, “चित्रकरणाचे काही भाग बाकी आहेत. त्यामुळे या वर्षी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते”. यामध्ये बॉबी देओलचे ‘काशीपुरवाले बाबा निराला’ हे पात्र अधिक पसंत केले आहे.

आणखी वाचा – “अरुंधती चुकली आणि ती…”, ‘आई कुठे…’चा नवा प्रोमो पाहून संजनाची बाजू घेत आहेत प्रेक्षक, नेमकं काय घडलं?, म्हणाले, “अनिरुद्ध व तिच्यामध्ये…”

दरम्यान बॉबीची जादू पुन्हा एकदा ओटीटीवर चालेल का? हे पाहण्यासारखे आहे. त्याला ‘ॲनिमल’ या चित्रपटाच्या निमिताने खूप प्रसिद्धी मिळाली. तसेच ‘आश्रम’च्या तिन्ही भागांमध्ये केलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक करण्यात आले आहे. या सीरिजमध्ये बॉबीबरोबर त्रिधा चौधरी, आदिती पोहानकर, ईशा गुप्ता, अनुप्रिया गोयंका, चंदन रॉय सनयाल, दर्शन कुमार, अनुरिता झा या कलाकारांनीही भूमिका साकारल्या होत्या. आता ही सीरिज कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: Aasharm seriesaashram series season 4new seasonseason
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Amit Thackeray answered what he will do if he become the Chief Minister see the details

"तुम्ही मुख्यमंत्री झालात तर...", अथर्व सुदामेने अमित ठाकरेंना विचारला प्रश्न, दिलं अगदी थेट उत्तर, म्हणाले, "लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.