सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांच्या जोड्या या एव्हरग्रीन आहेत. सुप्रिया पिळगावकर-सचिन पिळगावकर, प्रसाद ओक-मंजिरी ओक या कलाकाराच्या जोड्या नेहमीच चर्चेत असतात. अशीच एक चर्चेत असणारी जोडी म्हणजे अशोक सराफ व निवेदिता सराफ. अशोक व निवेदिता यांनी आजवर अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. खऱ्या आयुष्यात एकत्र आल्यापासून ही जोडी नेहमीच साऱ्यांच्या मनावर राज्य करताना दिसली. गेली ३५ वर्ष ही जोडी एकत्र सुखाचा संसार करत आहे. (Ashok Saraf And Nivedita Saraf Anniversary)
अशोक व निवेदिता यांच्या लग्नाला ३५ वर्ष पूर्ण होताच निवेदिता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. निवेदिता यांनी अशोक यांच्याबरोबरचा एक खास फोटो शेअर केला आहे. आणि या फोटोला खास कॅप्शन देत त्यांनी “बापरे ३५ वर्ष झाली”, असं म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांच्या लग्नाला ३५ वर्षं झाली आहेत.
निवेदिता यांनी लग्नात येणाऱ्या चढ-उतारांबाबत अशोक सराफ यांच्या ‘मी बहुरूपी’ या आत्मचरित्रात त्याचं मत मंडळ आहे. ‘हे लग्न टिकणार नाही’ असं त्यावेळी अनेकांना वाटलं होतं. आणि अनेकांनी निवेदिता यांना तसं बोलूनही दाखवलं होतं. यावर निवेदिता यांनी स्वतःच मत मांडत असं म्हटलं की, “लग्न करायचं तर ते टिकवण्यासाठीच असं मी पक्कं ठरवलं होतं. त्यासाठी लागतील ते आणि तेवढे प्रयत्न करण्याची माझी तयारी होती. कारण कोणतंही लग्न आपोआप टिकत नाही, त्यासाठी मेहनत करावीच लागते, तशी मी केलीये, असं मला वाटतं असं निवेदिता म्हणाल्या.

यापुढे निवेदिता यांनी म्हटलंय की, त्यासाठी प्रसंगी माझ्या करिअरशी तडजोड केलीये. स्वतःला बदललंय. अर्थात हे मी एकटीनंच केलंय असं नाही. अशोकनंही त्याच्या बाजूनं तेच केलंय. या नात्याशी शंभर टक्के बांधिलकी मानणारा नवरा मला मिळाला म्हणून मी स्वतःला अतिशय नशीबवान मानते. माझं सुखाचं आणि समाधानाचं पारडं खूप जास्त जड आहे.