‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये अनेक चित्रपट , मालिका ,नाटंकांचे प्रमोशन केले जातात. या मधील सर्वच कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने घराघरात पोहचले आहेत. कलाकारांसह वाद्यवादकानीं देखील त्यांची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.’चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणारा तुषार देवल घराघरांत पोहचला आहे. काही विनोदी स्किटमध्ये देखील तुषार छोट्या भूमिकांमध्ये पहायला मिळतो. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये ‘घुमर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन याने हजेरी लावली होती. त्यादरम्यान अभिनेता अभिषेक बच्चनने संगीत संयोजक तुषार देवल याच्या कामाचं कौतुक केलं.(abhishek bacchan compliment)
तुषार देवल याने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. त्यात कॅप्शन मध्ये लिहलं कि, “जेव्हा अभिषेक बच्चन विचारतो , ये आप live music करते हो?”मी म्हणतो हो. अभिषेक म्हणतो कैसे? …… मी म्हणतो मेरे पास Que लिखे होते है.. अभिषेक म्हणतो ooohhhh फिर भी?…..तेव्हाच भरून पावलो…..बॉलीवूड मधील एक अभिनेता एवढ्या कौतुकाने विचारतो.आपल्या कामाची दखल घेतो …. फारच कमाल ….”
हे देखील वाचा:- फुफ्फुसं ८०-८५ टक्के निकामी, गंभीर आजार, शस्त्रक्रिया अन्…; विद्याधर जोशींना झालेला गंभीर आजार खुलासा करत म्हणाले, “जगातून गेल्यानंतर…”
हिंदी सिनेसृष्टीमधील कलाकार जेव्हा मराठी कलाकाराचं कौतुक करतात तेव्हा त्यांचा आनंद हा गगनात मावत नाही. कलाकाराला आपल्या कामाची पोचपावती मिळाल्यावर काम करण्याची ऊर्जा अजून वाढते. इतकं बारीक निरीक्षण करत अभिषेकने तुषारचं कौतुक केल्यामुळे तुषार भारावून गेला. तुषारने केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
हे देखील वाचा:- “प्रसिद्धीपुरता त्याने…”, घटस्फोट व नवऱ्याबाबत मानसी नाईकचं मोठं भाष्य, रडत म्हणाली, “माज दाखवतात आणि…”
तुषार देवलची पत्नी म्हणजेच अभिनेत्री स्वाती देवल हीने देखील या पोस्टवर वर कमेंट करत म्हंटल, तुषार तू ग्रेट आहेस.. म्हणूनच तर तुझ्यासोबत लग्न केलं.. तुझं तबला वाजवणं, संगीताबद्दलची जाण, उस्फुर्तपणा आणि प्रेम पाहून तर प्रेमात पडले होते. एका नेटकाऱ्याने कमेंट करत , Wowww thats so Amazing!! तर दुसऱ्या नेटकऱ्याने छान तुषार.. अभिनंदन.. आम्ही तुला बरीच वर्ष पाहत आहोत असं पुढे जात रहा अश्या कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.