सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझी खिल्ली उडवण्यात आली अन्…”, ‘चंद्रमुखी’च्या वादावर मानसी नाईकचा मोठा खुलासा, म्हणाली, “त्या व्यक्तीने मला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 19, 2023 | 10:44 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
manasi naik reaction on chandramukhi

“माझी खिल्ली उडवण्यात आली अन्...”, ‘चंद्रमुखी’च्या वादावर मानसी नाईकचा मोठा खुलासा, म्हणाली, “त्या व्यक्तीने मला...”

मराठीमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘चंद्रमुखी’. ‘चंद्रमुखी’ चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत होती. तिच्या कामाचं व नृत्याचं विशेष कौतुकही झालं. पण ‘चंद्रमुखी’ची चर्चा सुरु असताना आणखी एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे मानसी नाईक. या चित्रपटासाठी मुख्य भूमिका मानसीला ऑफर करण्याता आली होती यावरुन बराच वाद रंगला. यावर मध्यंतरी तिने भाष्यही केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मानसीने या वादावर पुन्हा वक्तव्य केलं आहे.

भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये मानसीला ‘चंद्रमुखी’बाबत विचारण्यात आलं. यावेळी मानसी म्हणाली, “जेव्हा विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ चित्रपट बनवला जाणार अशी चर्चा होती तेव्हा ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यावेळी मी, विश्वास सर आणि सुबोध सर आम्ही तिघेहीजण बोलत होतो. दरम्यान ‘चंद्रमुखी’चा विषय सुरु होता. त्यावेळी सुबोध भावे सर ‘चंद्रमुखी’चे दिग्दर्शन करणार होते”.

आणखी वाचा – फुफ्फुसं ८०-८५ टक्के निकामी, गंभीर आजार, शस्त्रक्रिया अन्…; विद्याधर जोशींना झालेला गंभीर आजार खुलासा करत म्हणाले, “जगातून गेल्यानंतर…”

“ते म्हणाले होते, ‘माझी चंद्रमुखी तू!’. हा संपूर्ण प्रकार मी एका मुलाखतीत कोणाचेही नाव न घेता सांगितला होता. त्यावेळी एका वेगळ्याच वादाला सुरुवात झाली. आज मी स्पष्टच सांगते की, मला प्रसाद ओक किंवा प्लॅनेट मराठीने केव्हाच ‘चंद्रमुखी’साठी विचारलं नव्हतं. हा विषय खूप आधीचा होता. तेव्हा दिग्दर्शक-निर्माते वेगळे होते”.

आणखी वाचा – “त्याचं डोकं फाटलं, माझ्या डोक्याला…”, एकदा नव्हे तर दोनवेळा मानसी नाईकला मृत्यूने गाठलं, म्हणाली, “मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर…”

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

“‘चंद्रमुखी’च्या टीमने माझं नाव घेऊन यानंतर माझी प्रचंड खिल्ली उडवली. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. ज्या व्यक्तीने खिल्ली उडवली त्या व्यक्तीने माझ्याबरोबर काम केलं होतं. त्या व्यक्तीने मला स्वत: हे सगळं विचारण्यासाठी फोन केला. मला ती फोनवरती खूप बोलली. मला याचं वाईट वाटलं. मी तिची खूप मोठी चाहती होते. त्यादिवशी तिने तिची चाहती गमावली. मी त्या व्यक्तीचं आता नाव घेणार नाही.” असं मानसीने सांगितलं.

Tags: amruta khanvilkarmanasi naikmarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Abhijeet kelkar post

Video : “पुरुषांवर संस्कार…”, सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याचा मुलगा शिकतोय स्वयंपाक, बनवली चपाती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.