काही खलनायिका या नायिकांपेक्षा ही प्रसिद्ध होतात. आणि खलनायिका म्हणून प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.लगोरी, तुला पाहते रे,खुलता कळी खुलेना तर नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतलेली मालिका म्हणजे तू तेव्हा तशी यांसारख्या अनेक मालिकांमधून अभिज्ञा घरोघरी पोहोचली.अभिज्ञाचं सौंदर्य आणि अभिनय याचे अनेक चाहते आहेत. कामाबरोबरच अभिज्ञा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील विशेष चर्चेत असते. मेहुल पै सोबत अभिज्ञा विवाहबंधनात अडकली त्यानांतर अभिज्ञा प्रग्नेंट आहे का अशा चर्चांना उधाण आले होते.(Abhidnya Bhave Air Hostes)

आता अभिज्ञाला प्रेक्षक एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखत असेल तरी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अभिज्ञा एअर हॉस्टेस म्हणून नोकरी करायची याबद्दल अभिज्ञाने अनेकदा खुलासा केला आहे, एअर हॉस्टेस आणि अभिनेत्री ही दोन टोकाचे करिअर असताना अभिज्ञाने एअर हॉस्टेस ची नोकरी का सोडली आणि अभिनय क्षेत्राकडे अभिज्ञा कशी वळली हे जाणून घेऊया.

अभिज्ञाने असं कधी ठरवलं नव्हतं की, ती एअर हॉस्टेस किंवा अभिनेत्रीचं होईल.तिला इतरांसारखी ९ ते ५ अशी नोकरी करायची नव्हती, किंवा डॉक्टर,इंजिनिअर असं काही व्हायचं नव्हतं. तिने काय करायचय हे ठरवलं नसलं तरी तर तिला काय नाही करायचय हे मात्र तिने ठरवलं होत.अभिज्ञा जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा तिथे एअर हॉस्टेसचं एक ट्रेनींग सेंटर होत. त्यामुली तिला फार आवडायच्या ते प्रोफेशन आवडायला लागलं.मग अभिज्ञाला वाटलं आपण ही करून बघावं म्हणून तिने कोर्स जॉईन केला इंटरव्ह्यू दिले आणि पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये अभिज्ञा सिल्केट झाली.तेव्हा अभिज्ञा फक्त १७ वर्षांची होती.वय कमी असल्यामुळे आई वडिलांचा सुरवातीला अभिज्ञाच्या एअर हॉस्टेस होण्याला विरोध होता.परंतु नंतर ते तयार झाले.

पाहा अभिज्ञाला चार वर्षांनंतर एअर हॉस्टेसची नोकरी का सोडावी लागली? (Abhidnya Bhave Air Hostes)
सुरुवातीचे २-३ महिने अभिज्ञासाठी फार कठीण होते, प्रत्येक फ्लाईटनंतर ती रडत घरी जायची.भयंकर अभ्यास,तुम्ही छानच दिसलं पाहिजे, आजूबाजूला असणार राजकारण हे खूप अंगावर येत.पंरतु या सगळ्यवारही मात करून अभिज्ञाने जवळ जवळ चार वर्ष एअर हॉस्टेस म्हणून काम केले.परंतु या सगळ्याचा परिणाम अभिज्ञाच्या तब्बेतीवर झाला, आणि तिला स्लिप डिस्कचा त्रास झाला. २ महिने अभिज्ञा हॉस्पिटल मध्ये होती.
दरम्यान तिचा व्यायाम नव्हता.कोल्ड ड्रिंक्स ती अक्षरशः व्यसन लागे पर्यंत प्यायची, प्रवास्यांचं सामान उचलून ठेवायचे, मोठ्या हिल्सच्या चप्पल वापरायच्या आणि त्याच्या परिणामरुपी तिला स्लिप डिस्कचा त्रास झाला.तेव्हा अभिज्ञाने ठरवलं की आता आपल्याला काही तरी वेगळं करावं लागणार आहे.तेव्हाअभिज्ञाच्या आईने श्रावण क्वीन मद्ये सहभागी व्हायला लावलं. त्यांनतर तिने तिच्या मराठी भाषेवर काम केलं. हिंदी चित्रपटांमध्ये पासिंगची काम केली.आणि मग हळू हळू अभिज्ञा अभिनय क्षेत्राकडे वळली.आणि आज लाडक्या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री अभिज्ञा भावाचं नाव आवर्जून घेतलं जात.(Abhidnya Bhave Air Hostes)

हे देखील वाचा : भांडायला तू घरी तरी असतोस का-सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची मजेशीर जुगलबंदी