बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांनी तब्बल १५ वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०२१मध्ये आमिर व किरण दोघे वेगळे झाले. या बातमीने त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. मात्र विभक्त होऊनही त्यांच्या नात्यात आदर कायम असलेला पाहायला मिळतो. आमिर व किरण यांनी त्यांचा मुलगा आझादला एकत्र वाढवताना दिसत आहेत. बरेचदा दोघेही कुटुंबातील सण-उत्सवात वा सोहळ्यातही एकत्र आलेले दिसले आहेत. किरण नुकतीच ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आली. अशातच आता किरण राव हिने दिलेली एक मुलाखत चर्चेत आली आहे. किरण आमिरपासून का वेगळे झाली, याचा खुलासा तिने केला. (Kiran Rao On Aamir khan)
किरण रावने ‘ब्रूट इंडिया’ला एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने तिच्या चित्रपट आणि नातेसंबंधांबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. तसेच लग्न आणि विभक्त होण्यावरही ती बोलली. किरण म्हणाली, “आमिर व मी लग्नाआधी जवळपास एक वर्ष एकत्र राहिलो होतो आणि खरे सांगायचे तर आम्ही आमच्या पालकांमुळे हे केले. त्यावेळेसही आम्हाला माहीत होते की, लग्नानंतर जर आम्ही एकत्र नीट राहू शकलो, एकत्र काम करु लागलो तेव्हाच आम्ही उत्तम जोडपे होऊ शकतो”.
किरण राव हिने सांगितले की, लग्नाचा एखाद्या व्यक्तीवर कसा नकारात्मक प्रभाव पडतो, जिथे ती व्यक्ती अडकल्यासारखे वाटू शकते. याबाबत बोलताना ती म्हणाली, “मला वाटते की लग्नामुळे तुमच्यावर, विशेषत: महिलांवर कसा अत्याचार होतो याबद्दल आपण उघडपणे बोलत नाही. मग स्वत:ला सुधारण्याचा मार्ग कसा शोधायचा हे तुम्हाला कसे कळेल तर यावर वाद व चर्चा व्हायला हवी असे मला वाटते. शांत राहू नका”.
तिच्या अनुभवाबद्दल बोलताना किरणने तिच्यावर ओढवलेली ही परिस्थिती कशी हाताळली हेदेखील सांगितले. किरण म्हणाली, “माझ्याकडे खूप चांगला वेळ होता, त्यामुळे मी त्याची काळजी केली नाही. आमिर व मी खूप मजबूत होतो आणि दोन व्यक्ती म्हणून आमच्यात घट्ट नातं अजूनही आहे. आम्ही एकमेकांशी खूप जोडलेले आहोत. तसेच एकमेकांचा खूप आदर करतो आणि एकमेकांवर प्रेम करतो. म्हणूनच तो बदलला नाही आणि मला याची काळजी वाटत नाही”.