शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : शेवटी बापच तो! त्याक्षणी लेकीसाठी ढसाढसा रडला आमिर खान, म्हणालेला, “गेल्या वर्षांत ती माझ्यापेक्षा…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 17, 2024 | 4:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aamir Khan got emotional in her daughter ira’s wedding video viral on social media

Video : शेवटी बापच तो! त्याक्षणी लेकीसाठी ढसाढसा रडला आमिर खान, म्हणालेला, "गेल्या वर्षांत ती माझ्यापेक्षा…"

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानने काही महिन्यांपूर्वी प्रियकर नूपुर शिखरेशी लग्न केले. आयरा व नुपूरचे लग्न अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडले. आयरा खानच्या लग्नात वडील आमिर खान खूपच वहावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. याची एक पोस्ट आयराने शेअर केली आहे. आयराने ‘फादर्स डे’ निमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये आमिर खान आपल्या मुलीसाठी भावनिक गाणे गाताना दिसत आहे. यामध्ये आमिरबरोबर त्याचे संपूर्ण कुटुंबही दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये आमिर खानने लेकीच्या संगीतात पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद खान यांच्याबरोबर ‘फूलों का तारों का सबका कहना है’ हे गाणं गायलं. यावेळी आझाद खानने ‘एक हजारो में मेरी बेहना है’ ही ओळ गाताच आयरा खूपच भावूक झाली. त्यानंतर आमिर ‘बाबुल की दुआं लेती जा…’ हे गाणे गायले आणि यावेळी आमिर खानही भावूक झाला.

View this post on Instagram

A post shared by Ethereal Studio (@etherealstudio.in)

आणखी वाचा – ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील सिंबाच्या खऱ्या आयुष्यातील वडिलांचीही मालिकेत भूमिका, लेकाबरोबर ‘त्या’ सीनेमध्ये दिसले, कौतुकाचा वर्षाव

या व्हिडीओमध्ये आमिर आपल्या लेकीबद्दलच्या भावना व्यक्त करताना “आयरा खूप लवकर मोठी झाली. मला वाटतं गेल्या तीन वर्षात ती माझ्यापेक्षाही लवकर समजूतदार झाली आहे. मला खूप आनंद होतं आहे की आयरा आणि नूपुर विवाहबंधनात अडकले आहेत. ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि  लग्न करत त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी खूपच आनंदी आहे” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : सचिन पिळगावकरांच्या सासऱ्यांचा ८६व्या वर्षी भन्नाट डान्स, कुटुंबियांबरोबर जंगी सेलिब्रेशन, घरही आहे इतकं सुंदर

३ जानेवारी २०२४ या तारखेला दोघांनी एकमेकांशी लग्न केले. मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न पार पडल्यानंतर उदयपूरमध्ये दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. मुंबईत पार पडलेल्या आयरा-नुपूरच्या अनोख्या लग्नाची लग्नाची खूपच चर्चा झाली होती. मुंबईतील या लग्नात नवरदेव नुपूर शिखरे हा घरातून धावत धावत लग्नस्थळी पोहोचला होता.   

Tags: aamir khanBollywood entertainment newsira khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Prathamesh Parab Wife Emotional

Video : सासरी जाताना बाबांना मिठी मारुन रडायला लागली प्रथमेश परबची बायको, कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.