बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान ही नुकतीच ३ (जानेवारी) रोजी बॉयफ्रेंड नुपूर बरोबर विवाहबंधनात अडकली. कायदेशीर नोंदणी पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला असून घरच्या काही मोजक्या कुटुंबियांनी व मित्रपरिवाराने या सोहळ्याला हजेरी लावली होती. आयरा आणि नूपुरने याआधी नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकल्यानंतर आज उदयपूर येथे शाही पद्धतीने त्यांचा पुन्हा एकदा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. अशातच त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. (Nupur Shikhare and Ira Khan Marriage)
७ जानेवारीला रोमँटिक डिनर पार्टीनंतर आज या जोडीचा मेहेंदी समारंभ पार पडणार आहे. आयराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मेहेंदी सोहळ्यासाठीच्या तिच्या खास लूकची एक झलक शेअर केली आहे. आमिर खानची लेक आयराच्या हातावर नुपूर शिखरेच्या नावाची मेहंदी लागणार आहे. अशातच त्यांचा काल (७ जानेवारी) रोजी यांचा संगीत समारंभ पार पडला. आयरा नुपूर यांच्या खास संगीत सोहळ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावेळी किरण राव यांनी आयरा- नुपूर यांच्यासाठी खास गाणे गायले असल्याचे पाहायला मिळाले.
आयरा-नुपूर यांच्या संगीत समारंभात किरण रावने खास गाणे गायले आणि हे गाणे गात असताना आयरा-नूपुर यांनी या गाण्यावर रोमॅंटिक डान्सही केला. त्याचबरोबर त्यांच्या लग्नानिमित्त जमलेल्या इतर पाहुणे मंडळींनीदेखील किरण राव यांच्या गाण्यावर ठेका धरला. यावेळी किरण राव यांच्याबरोबर तिचा मुलगादेखील यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, आयरा- नुपूर हे येत्या १० जानेवारी उदयपूरमध्ये शाही पद्धतीने लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. आयरा-नुपूर यांचा हा शाही विवाहसोहळा उदयपूरच्या ताज अरवली हॉटेलमध्ये पार पडणार आहे.