कपिल शर्मा म्हटलं की त्याचा आणि त्याच्या शोचा खास चाहतावर्ग आहे. सामान्य प्रेक्षक वर्गच नव्हे तर बडे सेलिब्रिटीही कपिलचे चाहते आहेत. नुकतीच कपिलने अभिनेत्री कविता कौशिशच्या पंजाबी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रम सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्याच कार्यक्रमाला अभिनेता आमिर खान देखील उपस्थित होता. यावेळी आमिर आणि कपिल यांची भेट झाली. त्यावेळी आमिरने कपिलवर नाराजगी दर्शविली.
आमिरने कपिलबद्दल बोलताना सांगितलं की, ‘मला एक गोष्ट सांगायची आहे की तीन आठवड्यांपूर्वी मी कपिलला फोन करून सांगितलं होतं. खरं तर आजकाल मी कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतोय आणि काम कमी करतोय. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत मला कॉमेडी बघायला आवडते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मी काही ना काही कॉमेडी पाहतो. यांत गेल्या अनेक महिन्यांपासून मी कपिलचा शो पाहतो. आणि मी त्याचा खूप मोठा चाहता झालो आहे. त्यामुळे कपिल आला तेव्हा मी सगळ्यात जास्त खुश होतो.(Aamir khan Kapil Sharma)
पाहा आमिरने का केली कपिलची तक्रार (Aamir khan Kapil Sharma)
आमिर खान पुढे अस ही म्हणाला, कपिलमुळे माझी संध्याकाळ छान जाते. मी खूप हसतो माझी खूप करमणूक होते. म्हणून दोन-तीन आठवड्यांपूर्वी मी त्याला फोन केला आणि धन्यवाद देखील म्हटले होते. तू प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करतोयस त्याबद्दल धन्यवाद. लोकांचे मनोरंजन करणे हे मोठ काम आहे. तुला इथे पाहून मला खूप आनंद झाला. कपिल मी तुझा मोठा चाहता आहे. आणि तू मला शोमध्ये कधीच बोलावलं नाहीस. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कपिलने आजवर आमिरला शो मध्ये कधीच बोलावलं नाही म्हणून त्याने कपिलवरची नाराजगी सगळ्यांसमोर बोलून दाखविली.(Aamir khan Kapil Sharma)
हे देखील वाचा – “मी अभिनेत्री आहे म्हणून तो मला सोडून गेला…” EX बॉयफ्रेंड बद्दल मृणालने केला खुलासा
आमिरच्या या नाराजगीला उत्तर देत कपिल म्हणाला की, ज्या दिवशी तू येशील तो दिवस आमच्यासाठी भाग्यवान असेल. आमची भेट होते ती नेहमी गर्दीच्या ठिकाणीच होते. कित्येकदा बोलावलं तरी येऊन भेटतो सांगतात. पण नंतर ते थेट ३ वर्षांनीच भेटतात. यानंतर आमिर म्हणाला, की मी १०० टक्के येईन. पण कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी नाही तर मला फक्त मनोरंजन हवे आहे त्यासाठी मी येईन.
